घरकुल योजना 2024 असे तपासा तुमचे नाव यादीमध्ये Gharkul list 2024

जाणून घेवूयात घरकुल योजना Gharkul list 2024 ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. घरकुल योजनेचा लाभ मिळविण्यासाठी घरकुल सर्व्हेच्या यादीत तुमचे नाव असणे आवश्यक आहे.

तुमचे नाव घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आहे किंवा नाही हे कसे तपासावे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

PMAYG अर्थात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. अनेक नागरिकांना आपले नाव यादीत आहे कि नाही या संदर्भात माहिती नसते.

तुम्हाला देखील तुमचे नाव घरकुल यादीत आहे किंवा नाही हे तपासून बघायचे असेल तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील चेक करू शकता.

घरकुल योजना 2024  मोबाईलमध्ये शोधण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.

तुमच्या मोबाईलमध्ये उमंग हे ॲप्लिकेशन सर्च करून install करा.

ॲप्लिकेशन install केल्यावर ओपन करा.

6 अंकी MPIN set करून सबमिट या बटनावर क्लिक करा.

तुम्ही जर नवीन असाल तर register here या लिंकवर क्लिक करून नोंदणी करून घ्या.

नोंदणी केल्यावर लॉगीन करा.

तुमचा मोबाईल नंबर आणि mpin टाकून लॉगीन करा.

लॉगीन झाल्यावर पुढील प्रक्रिया खालीलप्रमाणे करा

आता या ठिकाणी तुम्ही लॉगीन झालेले आहात. मोबाईलमध्ये दिसणाऱ्या या चौकटीमध्ये PMAYG असा शब्द टाकून सर्च करा.

Pradhan Mantri Awas Yojna Gramin अशी लिंक दिसेल त्यावर टच करा.

Panchayat wise permanent wait list या पर्यायावर टच करा.

आता या ठिकाणी राज्य, जिल्हा, पंचायत समितीचे नाव आणि तुमच्या गावाचे नाव दिलेल्या पर्यायामधून निवडा आणि सर्च या बटनावर क्लिक करा.

जसेहि तुम्ही सर्च या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या गावातील ज्या लोकांना शासनाच्या वतीने घरकुल मिळालेले आहे त्यांची सर्वांची नावांची लिस्ट या तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसेल. लाभार्थीचे नाव किंवा अडनाव टाकून देखील घरकुल लाभार्थीचे नाव शोधता येते त्यासाठी फिल्टर या पर्यायावर टच करा.

त्यानंतर लाभार्थीचे नाव टाकून सर्च करा संबधित लाभार्थीची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेल्या स्क्रीनवर दिसेल.

Leave a comment