मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत आता जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहे या योजनेचा लाभ कोणत्या नागरिकांना घेता येणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
राज्यातील ६५ वर्षे वय असलेल्या व त्यावरील जेष्ठ नागरिकांचे जीवन सुखाचे व्हावे त्यांना वयोमान परत्त्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदीसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी १५ मार्च २०२४ पर्यंत समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करावे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, तुम्ही कोणते साहित्त्य खरेदी करणार आहे त्याची माहिती अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.
या योजनेमुळे अनेक जेष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
योजनेचे निकष व काय लाभ मिळणार
योजनेच फायदा घेण्यासाठी लाभार्थीने ३१ डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेली असावी तसेच राष्ट्रीय योजनेचा केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा मागील तीन वर्षात लाभ घेतलेला नसावा.
या योजनेंतर्गत चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपेड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, लंबर बोल्ट, सर्वईकल कॉलर आदि आवश्यक साहित्य साधने उपकरणे खरीदिसाठी तीन हजार रुपयापर्यंत रक्कम महाडीबीटी द्वारे खात्यात जमा केली जाणार आहे.
असा करा अर्ज
आधारकार्ड, मतदान कार्ड, सक्षम अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आधार सलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्याचे पासबुक झेरोक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, दोन लाख रुपयाच्या आत असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वयघोषणापत्र आदि कागदपत्राची आवश्यकता आहे.
अर्ज सादर केल्यानंतर त्याची तपासणी करून पात्र लाभार्थीची निवड केली जाणार आहे
त्यानंतर योजनेचा लाभ दिला जाणार आहे योजनेचा लाभ घेण्यसाठी अनेक जेष्ठ नागरिक अर्ज करीत आहे.