या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी १३ कोटीची मदत जाहीर

नुकसान भरपाईसाठी १३ कोटीची मदत : या खरीप हंगामात जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त दहा हजार ५०६ शेतकऱ्यांसाठी शासनाने १२ कोटी ९० लाख १७ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. याबाबत शासनाचा आदेश निघाला आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सुद्धा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे ९५८८ हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त क्षेत्राचे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागामार्फत संयुक्त पंचनामे करून सर्वेक्षण करण्यात आले.

त्यानंतर मदतीची मागणी शासनाकडे करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने १२ कोटी ९० लाख १७ हजार रुपये मंजूर केले आहेत. त्याचा फायदा दहा हजार ५०६ शेतकऱ्यांना मिळेल. नुकसान भरपाईसाठी १३ कोटीची मदत

या पिकांचे झाले नुकसान- कपाशी, सोयाबीन, तूर

  • नुकसानग्रस्त गाव संख्या १५२
  • शेतकरी संख्या १०५०६
  • क्षेत्र ९४७४.३७ हेक्टर
  • मंजूर निधी १२ कोटी ९० लाख ६४ हजार

तालुकानिहाय नुकसान

तालुका गावे शेतकरी

  • बार्शीटाकळी ५८ २३७०
  • अकोला ६८ ६६३३
  • मूर्तिजापूर ८ ४७१
  • पातुर १४ १००८
  • अकोट ४ २४
  • एकूण १५२ १०५०६
  • एकूण निधी : १२ कोटी ९० लाख ६४ हजार

Leave a comment