फळबाग लागवड अनुदान मिळणार बघा जी आर

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पिढी दरपिढी पारंपारिक शेती करत आलेलो आहे. आपल्या वडिलांनी किंवा त्यांच्या वडिलांनी ज्याप्रकारे शेती केली त्याच प्रकारे शेत करून आता आपल्याला जमणार नाही. आता आपल्याला पण वेलेसोबत बदलावे लागणार आहे. तुम्ही विचार कराल कि बदलावे कसे? तर मित्रांनो तुम्ही फळबाग लागवड करून हे करू शकता. फळबाग लागवडीसाठी कमी श्रम लागते आणि ज्यादा उत्पन्न येते. आता तुम्हाला फळबाग लागवडीसाठी जास्त खर्च सुद्धा करायचे कमी नाही म्हणजे शासन आता तुम्हला फळबाग लागवड अनुदान देत आहे त्यासंदर्भात शासनाचा जी आर आलेला आहे.

स्व. भाऊसाहेब फुंडकर योजनेंतर्गत मिळणार फळबाग लागवड अनुदान

फळबाग लागवडीसाठी अनुदान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतगगत सुद्धा मिळते परंतु सर्वसाधारण नागरिक यासाठी पत्र ठरत नाही. त्यासाठी राज्य शासनाने स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना चालू केलेली आहे. ह्या योजनेचा अर्थातच सर्व शेतकरी बांधवाना फायदा होणार आहे.

फळबाग लागवड अनुदान किती मिळणार अनुदान

शासनाने स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंबलबजावणी साठी राज्य शासनाने 3753.18 लाख (रुपये सदोतीस कोटी त्रेपन्न लाख अठरा हजार फक्त) इतका निधी मान्य झालेला आहे. संपूर्ण माहितीसाठी शासन निर्णय म्हणजेच जी आर बघा. जी आर डाउनलोड करा या बटनावर टच करा.


फळबाग लागवड अनुदान

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान अर्ज करण्याची प्रोसेस

  • सर्प्रथम गूगल सर्च बर मध्ये mahadbtmahait.gov.in/farmer असे टाईप करा आणि सर्च करा.
  • नंतर mahadbt हि वेबसाईट ओपेन होईल.
  • त्यानंतर तुम्हाला login करायचं आहे login करण्यासाठी तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड लागेल.
  • जर तुम्ही अगोदर mahadbt वर नोंदणी केली असेल तर तुम्हाला युसार आयडी मिळालेला असेल.तो तिथे टाकायचा आहे.

नोंदणी केलेली नसेल तर मग अगोदर नोंदणी करून घ्या

  • नंतर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर login करा.
  • login केल्यानंतर तुमचा dashboard ओपेन होईल.
  • dashboard वर तुम्हाला निळ्या रंगामध्ये अर्ज करा असे दिसेल त्याला click करा.
  • click केल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसेल.
  • त्यातील फलोत्पादन या समोरील बाबी निवडा या पर्यायावर click करा.
  • click केल्यानंतर एक form ओपेन होईल.

आणखी कामाची योजना शेतकरी ट्रॅक्टर योजना अनुदान नवीन GR

form मध्ये भरायची माहिती.

  • तालुका.
  • गाव.
  • गट क्रमांक.
  • मुख्य घटक. ( यामध्ये फळबाग या पर्यायाला निवडा)
  • घातक प्रकार.(इतर घातक निवाडा )
  • घटक निवडा . ( या मध्ये फळबाग लागवड (फळे,फुले,मसाले व सुगंधित पिके ) हा पर्याय निवडा )
  • बाग निवडा. ( यामध्ये फळपिके हा पर्याय निवडा )
  • योजना निवडा. ( या यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना निवडा )
  • पिक निवडा. (या पर्यायामध्ये तुम्हाला सीताफळ, आंबा अंजीर इत्यादी प्रकार दिसेल त्यापैकी कोणताही एक पर्याय निवडा)
  • फळबाग लागवडीसाठी प्रस्थापित क्षेत्र in hectare. आणि गुंठा.
  • आणि नंतर जतन करा या बटनावर click करा.

Leave a comment