नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना 381 कोटीची विमा भरपाई Pik Vima Bharapai 2023 मिळणार असून त्या संदर्भात माहिती या या ठिकाणी जाणून घेऊया.
2021 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीचे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते.
मात्र विमा कंपनीने योजनेतील निकषांचा चुकीचा अर्थ लावत शेतकऱ्यांना एकूण भरपाईच्या 50 टक्के रक्कम वितरित केली होती.
त्या अनुषंगाने राज्यस्तरिय तक्रार निवारण समितीकडे दाखल झालेल्या अपीलास अनुसरून मंगळवारी मुंबईत समीचीती बैठक पार पडली.
त्यात तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय कायम ठेवत 381 कोटीची उर्वरित विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आणखी कामाची गाळयुक्त शिवार योजना आता मागेल त्याला गाळ
Pik Vima Bharapai 2023 शेतकऱ्यांना उर्वरित विमा भरपाई मिळणार
2021 च्या सप्टेंबर अखेरेस व ऑक्टोबर महिन्यात खूप मोठी अतिवृष्टी झाली होती एन काढणीच्या काळात पाऊस भरसल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे पूर्णतः नुकसान झाले होते.
त्यानंतर कंपनीने भरपाई निश्चित करताना काढणी कालावधी निकषांचा अर्थ चुकीच्या पद्धतीने काढून शेतकऱ्यांना 50 टक्क्यानेच रक्कम वितरित केली.
यावर तक्रार झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक झाली.
या बैठकीत शासनाने निश्चित केलेला काढणी कालावधी कंपनीच्या लक्षात आणून दिला. त्यामुळे संपूर्ण भरपाई मिळणे अपेक्षित होते.
दरम्यान तो पर्यंत निश्चित केलेली भरपाई वितरित करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार कंपनीने शेतकऱ्यांना जवळपास 381 कोटी निधीचे वितरण केले.
पुढे हा विषय विभागीय आयुक्त स्तरावरील समितीकडे गेल्यानंतर तेथेही जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवण्यात आला. मात्र कंपनीने उर्वरित भरपाई वितरित करण्यास टाळाटाळ केली.
शेतकऱ्यांना उर्वरित विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा
शेतकरी प्रतिनिधि म्हणून अनिल जगताप यांनी राज्यस्तरीय समितीकडे अपील केली त्यानुसार मंगळवारी या समितीची बैठक पार पडली.
या बैठकीत सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवण्यात आला त्यामुळे आता उर्वरित विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य समिति येत्या काही दिवसातच या बाबत लेखी आदेश काढण्यात असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता आणखी विमा भरपाई मिळणार आहे.
2021 सालचा विम्याबाबत सकारात्मक बैठक झाली निर्णय देखील शेतकऱ्यांच्या हिताचाच घेण्यात येणार आहे
केवळ उर्वरित भरपाईची रक्कम नवे तर योजनेतील नियमानुसार 12 टक्के व्याजासह ही भरपाई मिळावी यासाठी बैठकीत आग्रह धरण्यात आला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अधिक महितीसाठी बातमी बघा