पीएम किसान निधी मिळणार आता सर्वांना

शेतकरी बंधुंनो पीएम पीएम किसान निधी विषयी तुम्हाला माहिती असेलच. ज्यांना नसेल त्यांच्यासाठी आपण अगोदर बघूया या योजनेची थोडक्यात माहिती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही भारत सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत, 2 हेक्टर (4.9 एकर ) पेक्षा कमी जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते.

पीएम किसान निधी लाभार्थ्यांची होणार तपासणी जाणून घेवूयात या संदर्भातील अधिक माहिती. अनेक शेतकऱ्यांना pm किसान सन्मान निधी अंतर्गत वर्षाला ६००० रुपयांचे अर्थ सहाय्य दिले जाते. पीएम किसान योजना pm kisan yojana अंतर्गत अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिलेली नाही.

कडबा कुट्टी मशीन योजना सुरू करा ऑनलाईन अर्ज

पीएम-किसान योजनेसाठी राज्यभर शिबिर पीएम किसान निधी मिळणार आता सर्वांना

मित्रांनो या येत्या २५ मार्च २०२२ रोजी पीएम किसान निधी संदर्भात ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांची शहानिशा केली जाईल. एखाद्या शेतकऱ्याने आर करूनही त्या शेतकऱ्यास पीएम किसान सन्मान निधीचा लाभ का मिळत नाही हे तपासले जाईल आणि वंचित राहिलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना यांचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

दिलेल्या यादीमध्ये एखाद्या शेतकऱ्यांचे नाव असेल परंतु त्यांना अद्यापहि pm kisan sanman nidhi मिळत नसेल तर अशा शेतकरी बांधवानी शिबिरामध्ये हि बाब संबधित अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून द्यावी. कागदपत्रांची आवश्यकता असेल तर ते सर्व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत.

या योजनेची सध्यस्थिती बघा

  • ११४ लाख ९३ हजार शेतकऱ्याची नोंदणी यापैकी १०९ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना मदत प्राप्त.
  • आतापर्यंत १८००० हजार कोटी रुपयापेक्षा जास्त मदतीचे वाटप मात्र ८ लाख ५३ हजार शेतकऱ्यांच्या तपशिलामध्ये त्रुटी.
  • 2 लाख 51 हजार शेतकऱ्याच्या बँक खात्याशी व्यवहारात अडचणी.
  • १ लाख १८ हजार शेतकऱ्याचा आधार क्रमांक व्यवस्थित जोडलेला नाही.
  • ६५ हजार शेतकऱ्याचा तपशील पीएफएमएस प्रणालीशी जोडलेला नाही.
  • १ लाख ५८ हजार शेतकऱ्याच्या इतर महत्वाच्या नोंदणी मधील त्रुटी दूर केलेल्या नाहीत.

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र २०२२

  • शिबिरातील सरकारी कर्मचाऱ्याला त्याने मागणी केलेली कागदपत्रे त्यांना द्यावी.
  • शासनाकडून आलेल्या लघुसंदेशातील (एमएमएस) नुसार कागदपत्रे जमा करावी.
  • बँकेचे खाते पुस्तक किंवा धनादेश पुस्तक, आधार कार्ड, सात बारा उतारा, आठ अ उतारा यापैकी कोणत्याही कागदपत्राची गरज भासू शकते.

मित्रांनो विविध शासकीय योजनांची माहिती आपल्या मोबाईलवर मिळवायची असेल तर आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

सामील व्हा शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.

1 thought on “पीएम किसान निधी मिळणार आता सर्वांना”

Leave a comment