PM kisan yojana केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार
रुपये मिळतात. ही रक्कम हप्त्यांमध्ये दिली जाते. एका वर्षात ३ हप्ते आहेत. सरकारने २७ जुलै रोजी १४ वा आणि १५ नोव्हेंबरला १५ वा हप्ता जारी केला. आता शेतकरी १६ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ही योजना देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. तरीही अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत. कोणत्याही वर्गातील शेतकरी या योजनेचा लाभ घरबसल्या सहजपणे घेऊ शकतात. PM kisan yojana
पीएम किसान योजनेनुसार दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात १५वा हप्ता आला होता. अशा परिस्थितीत आता १६ वा हप्ता फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर येणे अपेक्षित आहे. सध्या १६व्या हप्त्यासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही.