शेतकऱ्यांना घरबसल्या पीक कर्जासाठी अर्ज करता येणार; 2 दिवसांत बँकेकडून कर्ज मिळणार

शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आता पीक कर्जासाठी अर्ज करण्यसाठी बँकेत फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. राष्ट्रीयीकृत बँकांकडून मिळणाऱ्या पीक कर्जासाठी शेतकरी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार ‘जनसमर्थ’ पोर्टलद्वारे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचा पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत माहिती दिली.

2 लाखांपर्यंत पीक कर्ज, किसान क्रेडिट कार्डद्वारे सुविधा

जनसमर्थ पोर्टलवर अर्ज केल्यानंतर लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत मिळणार आहे. योग्य कागदपत्रे असल्यास २ दिवसांत बँकांकडून प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करताना शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:

  • शेतकरी आयडी (Farmer ID)
  • आधार कार्ड
  • आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर
  • बँक पासबुक
  • पॅन कार्ड (असल्यास)

बँकेत जाण्याची गरज नाही, कोणतेही शुल्क नाही

जनसमर्थ पोर्टलमुळे शेतकऱ्यांना आता कर्जासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. विनाकारण कर्ज नाकारले जाणार नाही आणि कमी कालावधीत कर्ज मिळण्यास मदत होणार आहे.

विशेष म्हणजे या ऑनलाइन प्रक्रियेसाठी कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही.

सेतू केंद्र व महा ई-सेवा केंद्रांची मदत

या मोहिमेसाठी जिल्हा व तालुका प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येणार आहे. सेतू केंद्र, महा ई-सेवा केंद्र आणि ग्राहक सेवा केंद्र यांचाही सहभाग असणार आहे.

त्यामुळे संगणक किंवा इंटरनेटची अडचण असलेल्या शेतकऱ्यांनाही अर्ज करता येईल.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पात्र व गरजू शेतकऱ्यांना जनसमर्थ पोर्टलवर पीक कर्जासाठी अर्ज करून किसान क्रेडिट कार्ड सुविधा घ्यावी असे आवाहन केले आहे.

Leave a comment