समाज कल्याण योजनेअंतर्गत राबवली जाणारी योजनेपैकी एक योजना म्हणजे महिला समृध्दी कर्ज योजना. या योजनेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, योजनेच्या अटी, कर्जाची रक्कम, अर्ज कुठे करायचा इत्यादी. याची माहिती आपण आज या खालील लेखात बघणार आहोत.
महिला समृध्दी कर्ज योजना 2022
लेडीस व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य (समाज कल्याण) विभागाकडून महिलांसाठी हे धोरण राबविले जात आहे. या योजनेंतर्गत महिला व्यवसायीकांना तसेच समाजातील उपेक्षित घटकातील महिला मागासवर्गीयांना आर्थिक मदत दिली जाते. महिला सक्षमीकरण लक्षात घेऊन ही योजना देशभरातील विविध चॅनेल पार्टनर राबवित आहेत. या योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांना ओळखले जाते व त्यांना थेट किंवा बचत गट (एसएचजी) च्या स्वरूपात व्यवसाय कर्ज दिले जाते.
आणखी कामाची योजना प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना Apply Online Mudra Bank Loan 2022
महिला समृध्दी कर्ज योजना पात्रता
- महिला लाभार्थ्यांचे किमान वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
- एमएसवाय योजना ही समाजातील उपेक्षित महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने असल्याने कर्जाचे योग्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी पात्रतेच्या कठोर अटी आहेत.
- अर्जदाराच्या वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/- पर्यंत असावे तर शहरी भागासाठी अर्जदार कुटुंबाचे रु.१२००००/- पर्यंत असावे.
- लाभार्थी मागासवर्गीय जात किंवा अनुसूचित जातीचा असला पाहिजे.
- कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये.
- बचत कर्ज गट (बचत गट) आणि समाजातील मागासवर्गीय घटकातील महिला उद्योजकच या कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
- लाभार्थी बीपीएल श्रेणीतील असावेत.
कर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- जात प्रमाणपत्र.
- रहिवासी पुरावा (वीज बिल किंवा रेशन कार्ड).
- सेल्फ-ग्रुप मेंबरशिप आयडी कार्ड.
- ओळख पुरावा – मतदार ओळखपत्र.
- बँक खाती.
- उत्पन्न प्रमाणपत्र.
महिला समृद्धी कर्ज योजना वैशिष्ट्ये आणि फायदे
- महिलांचा आत्मविश्वास वाढतो.
- रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात मदत करते.
- महिलांना सशक्त आणि स्वावलंबी बनण्यास मदत होते.
- लाभार्थीची सामाजिक-आर्थिक स्थिती बदलते.
- महिलांमधील उद्योजकतेस प्रोत्साहन मिळते.
महिला समृध्दी कर्ज योजना योजनेचे स्वरुप
- प्रकल्प मर्यादा रु.५ लाखापर्यंत बचत गटातील २० सभासदांना प्रत्येकी रु.२५,०००/-
- व्याज दर ४%.
- परतफेडीचा कालावधी ३ वर्षे.
- राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग – ९५%
- बचत गटांमार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा.
- राज्य महामंडळाचा सहभाग – ५%.
महिला समृध्दी कर्ज योजना अर्ज करण्याची पध्दत
लाभर्थ्यांना अर्ज करून लाभ घेण्यासाठी कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे लागतील.
विविध शासकीय योजनाच्या माहितीसाठी आमच्याशी कनेक्ट व्हा खालील लिंक वर टच करून
शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.