मित्रांनो आज आपण या खलील लेखामध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना या योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत. या लेखामध्ये या योजनेचे फायदे कोणते, योजनेसाठी पत्र कोणकोण असेल, योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि या योजनेचा अर्ज कोठे करायचा याची माहिती आपण बघणार आहोत.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना माहिती
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर केली होती. आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना १५ फेब्रुवारी २०१९ पासून लागू करण्यात आलेली आहे.
भट्टी कामगार, घरगुती नोकर, रिक्षाचालक, मजूर, शिंपी, मोची इत्यादी असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सुरू केलेली आहे. मासिक उत्पन्न १५,०००/- रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणारे असंघटित क्षेत्रातील कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेअंतर्गत वयाच्या ६० वर्षानंतर लाभार्थ्यांना प्रतिमहा पेन्शन देण्यात येणार आहे. ही पेन्शन दरमहा ३,०००/- रुपये दिली जाईल. आत्तापर्यंत ४४.९० लाखांहून अधिक कामगारांनी नोंदणी केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला दरमहा गुंतवणूक करावी लागणार आहे. गुंतवणूकीची रक्कम ही वयाच्या आधारावर निश्चित केली जाईल. ही रक्कम ५५/- रुपयांपासून २००/- रुपयांपर्यंत असेल. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत अंदाजे १० कोटी लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची लाभ
- लाभार्थ्यांची पेन्शन रक्कम ही त्याच्या प्रीमियम रकमेवर अवलंबून असेल. त्याने जेवढी योगदान रक्कम भरलेली आहे, त्या रकमेनुसार सरकार तुमच्या खात्यात पैसे जमा करेल.
- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर प्रतिमहा ३,०००/- रुपये इतकी पेन्शन दिली जाईल.
- जर लाभार्थी या योजनेअंतर्गत पेन्शन घेताना मरण पावला, तर त्याच्या पेन्शनच्या रकमेच्या ५० टक्के रक्कम त्याच्या जोडीदाराला पेन्शन म्हणून दिली जाईल. म्हणजेच लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला १,५००/- रुपये प्रतिमहा पेन्शन मिळेल.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची आवश्यक पात्रता
- अर्जदार असंघटित क्षेत्रातील कामगार असावा.
- अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांत दरम्यान असावे.
- अर्जदाराकडे आधार क्रमांक आणि मोबाईल फोन असणे आवश्यक आहे.
- योजनेसाठी बँक खाते असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार व्यक्तीचे मासिक उत्पन्न १५,०००/- रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- पीएम श्रमयोगी मानधन योजना अर्जदार आयकर भरणारा नसावा.
- सरकारी कर्मचारी कर्मचारी भविष्य निधी (EPF) राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ESIC) चे सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PMSYM ) साठी अर्ज आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र.
- बँक खाते पासबुक.
- मोबाईल नंबर.
- पासपोर्ट फोटो.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना साठी अर्ज कसा करावा?
- इच्छुक अर्जदाराला सर्वप्रथम प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्व कागदपत्रांसह जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रांमध्ये जावे लागेल.
- यानंतर अर्जदाराला आपली सर्व कागदपत्रे सीएससी अधिकाऱ्याला द्यावी लागतील.
- यानंतर सीएससी अधिकारी एजंट तुमचा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना चा ऑनलाईन फॉर्म भरेल.
- अर्ज भरून झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट तुम्हाला देईल.
अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
अधिक महितीसाठी संपर्क साधा – 1800 267 6888
अशाच शासकीय योजनांच्या महितीसाठी आमच्यासोबत कनेक्ट व्हा खलील लिंक वर टच करून
आमच्याशी कनेक्ट व्हा – शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.