मित्रांनो आज आपण या लेखामध्ये श्रावण बाळ सेवा राज्य निर्धारण योजनाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. या पेन्शन योजनेच्या माध्यमातून राज्यातील वृद्ध लोक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील आणि त्यांचे हाल कमी होतील. राज्य सरकारच्या श्रावणबाळ योजना प्रमुख उद्दिष्ट्य हे राज्यातील जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य्य करून त्यांना आर्थिक स्थेर्य प्राप्त करुन देणे, हे आहे. वृद्ध काळात त्यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत म्हणून सरकार दरमहा ६००/- रुपयांचे सरकार मदत म्हणून जेष्ठ नागरिकांच्या खात्यात या योजनेअंतर्गत टाकणार आहे.
श्रावणबाळ योजना २०२२ लाभार्थी पात्रता
- अर्जदाराचे उत्पन्न वर्षाकाठी २१,००० पेक्षा जास्त नसावे.
- या योजनेचे लक्ष्य ६५ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या वृद्ध नागरिकांना निवृत्तीवेतन प्रदान करणे आहे.
- दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) श्रेणी आणि बिगर बीपीएल श्रेणी या दोन्ही श्रेणींना या योजनेचा लाभ मिळतो.
- अर्जदार हे महाराष्ट्रातील कायमचे रहिवासी असले पाहिजेत.
- अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा अधिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वर्षिक उत्पन्न २१,००० पेक्षा जास्त नसावे.
- नाव बीपीएल यादीमध्ये समाविष्ट केले जावे.
श्रावणबाळ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्ज.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- पासपोर्ट फोटो.
- उत्पन्नाचा प्रमाणपत्र.
- वय पुरावा.
- रेशन कार्ड.
श्रावणबाळ योजना ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे
- सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. अधिकृत वेबसाइट–https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
- नंतर मुखपृष्ठ तुमच्या समोर उघडेल.
- मुखपृष्ठावर तुम्हाला Register या लिंक वरती क्लिक करावे लागेल.
- तुम्ही तुम्ही उपलब्ध असलेल्या दोन पर्यायापैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करून नोंदणी करू शकता.
- नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल, तुमचा मोबाईल नंबर, ओटीपी आणि Username टाकावे लागेल.
- त्यानंतर, आपल्याला रजिस्टरवर क्लिक करावे.
- नंतर तुम्ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
- आता तुम्हाला मुख्यपृष्ठावर परत जावे लागेल आणि श्रावण बाल योजना या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही या लिंकवर क्लिक करताच तुमच्यासमोर एक लॉगिन फॉर्म दिसेल जिथे तुम्हाला तुमचे लॉगिन क्रेडेंशियल एंटर करावे लागेल आणि सबमिटवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर, एक नोंदणी फॉर्म तुमच्या समोर उघडेल जिथे तुम्हाला तुमचे नाव, संपर्क तपशील, ईमेल आयडी, पत्ता इ. टाकावे लागेल.
- पुढील पृष्ठावर, तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता आहे.
- नंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव, शाखेचे नाव, IFSC कोड एंटर करावे लागतील.
- सर्व तपशील सत्यापित केल्यानंतर आपल्याला सबमिट बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
- अर्ज यशस्वीरीत्या जमा केल्यानंतर, एक अर्ज क्रमांक तुमच्या समोर येईल.
- अश्याप्रकारे तुमची नोंदनीची प्रक्रिया पूर्ण होईल.
मित्रांनो अशाच शासकीय योजनाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा खलील लिंक वर टच करून.