नमस्कार शेतकरी बंधूंनो आता पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी ekyc करणे आवश्यक आहे. pm kisan kyc काशी करायची यासंबंधी आम्ही अगोदरच लेख प्रकाशित केलेला आहे तो तुम्ही खलील लिंक वर टाच करून बघू शकता.Pm kisan kyc status check
आज आपण या लेखामध्ये pm kisan kyc status check online कसे करायचे या विषयी जाणून घेऊया. म्हणजे तुम्हाला समजेल की तुमची pm kisan kyc झालेली आहे किंवा नाही.
Pm kisan kyc status check आपल्या मोबाईल मधून करण्यासाठी खलील पद्धत वापरा.
पहिली पद्धत
- pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा
- या ठिकाणी तुम्हाला Farmers Corner या ऑप्शनखाली beneficiary status हा पर्याय दिसेल.
- pm kisan वेबसाईटवर दिसत असलेल्या beneficiary status या पर्यायावर टच करा.
- त्यानंतर एक चौकट दिसेल त्यामध्ये तुमचा आधार नंबर टाका आणि त्यानंतर गेट डेटा Get data या बटनावर टच करा किंवा क्लिक करा.
- जसे हि तुम्ही Get data या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या अकाऊंटची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल.
- या माहितीमध्ये जर पेमेंट मोड AADHAR असे आले असेल तर तुमची pm किसान EKYC असे समजा.
दुसरी पद्धत
- मोबाईलमधील ब्राउजर उघडा.
- ब्राउजरच्या सर्चबारमध्ये pmkisan.gov.in असे सर्च करा.
- वेबसाईट ओपन झाल्यावर Farmers Corner या पर्यायाखाली ekyc हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- तुमचा आधार आणि मोबाईल नंबर टाका आणि गेट मोबाईल ओटीपी Get mobile otp या बटनावर क्लिक करा.
- या ठिकाणी जर तुम्हाला Mobile number already exist असा संदेश आल्यास तुमची ekyc झालेली आहे असे समजा.
अशा वरील दिलेल्या दोन्ही पद्धतीचा अवलंब करून तुम्ही Pm kisan kyc status check online करू शकता.
अधिक महितीसाठी व्हिडिओ बघा
मित्रांनो तुम्ही अजून पीएम किसान सन्मान निधिचे पैसे मिळत नसेल तर ते मिळवण्यासाठी आताचा रजिस्ट्रेशन करा
pm kisan samman nidhi yojana apply online registration process
- सर्वात अगोदर तुम्हाला pm kisan असं गुगलवर सर्च करावं लागेल.
- त्यानंतर PM-Kisan Samman Nidhiची ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
- त्यानंतर उजवीकडे तुम्हाला ‘फार्मर कॉर्नर’ हा पर्याय दिसेल.
- त्यावर क्लिक केलं की 7 पर्याय तुमच्यासमोर येतात. त्यातील पहिलाच पर्याय आहे New Farmer Registration.
- या पर्यायावर क्लिक केलं की ‘New Farmer Registration form’ नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
- इथं तुम्हाला आधार क्रमांक आणि captcha टाकायचा आहे.
- त्यानंतर एक रेजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सुरुवातीला शेतकऱ्याला वैयक्तिक माहिती भरायची आहे.
- यात सुरुवातीला state म्हणजे राज्य निवडायचं आहे, त्यानंतर district म्हणजे जिल्हा निवडायचा आहे. पुढे sub-district आणि block या दोन्ही ठिकाणी तुमच्या तालुक्याचं नाव निवडायचं आहे. आणि मग गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे.
- त्याखाली farmer name म्हणजे शेतकऱ्याचं नाव लिहायचं आहे.
- पुढे लिंग निवडायचं आहे आणि मग तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडता ते निवडायचं आहे.
- त्यानंतर फार्मर टाईप मध्ये शेतकऱ्याचा प्रकार निवडायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे 1 ते 2 हेक्टरदरम्यान शेती असेल तर तुम्हाला पहिल्या पर्यायावर क्लिक करायचं आहे, जास्त असेल तर अदर या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- आपण नोंदणीसाठी आधार क्रमांक दिलेला असल्यामुळे एक Identity proof number आपोआप जनरेट होतो.
Pm kisan kyc status check online
- आता पुढे तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती भरायची आहे. यामध्ये बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. हा कोड तुमच्या पासबुकवर दिलेला असतो. त्यानंतर बँकेचं नाव टाकायचं आहे आणि मग खाते क्रमांक टाकायचा आहे.
- त्यानंतर पत्ता टाकून झाला की, तुम्हाला Submit for Adhar authentication या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- या पर्यायावर क्लिक केलं, की “Yes, Aadhar Authenticated Succesfully” असा लाल अक्षरात मेजेस तिथं येतो. याचा अर्थ तुमचं आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या झालं आहे.
- यानंतर Farmers other details मध्ये शेतकऱ्याविषयीची इतर माहिती भरायची आहे. यात मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि आई किंवा वडिलांचं नाव लिहायचं आहे.
- त्यानंतर Land Holdingमध्ये जमिनीच्या मालकीचा प्रकार सांगायचा आहे. यात स्वत: एकट्याच्या मालकीची जमीन असेल, तर single या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि सामूहिक मालकीची शेतजमीन असेल तर joint या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर Add या पर्यायावर क्लिक करून शेतजमिनीची माहिती सांगायची आहे.
- आता इथं तुम्हाला सर्व्हे किंवा खाता नंबरमध्ये सातबाऱ्यावरील आठ-अ चा जो खाते क्रमांक आहे, तो टाकायचा आहे.
- त्यानंतर खासरा किंवा डॅगमध्ये सातबाऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुमच्याकडे किती शेतजमीन आहे, ते हेक्टरमध्ये लिहायचं आहे.
- हे टाकून add बटन दाबलं की तुमच्या माहितीची तिथं नोंद होते.
- ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर “[X]I certify that all the given details are correct” याचा अर्थ मी दिलेली सगळी माहिती खरी आहे, या पर्यायासमोरच्या डब्ब्यात टीक करायचं आहे
- सगळ्यात शेवटी सेव्ह या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर स्क्रीनवर एक मेसेज येईल. त्यावर लिहिलेलं असेल की, *****हा तुमचा identity proof number आहे आणि तुम्ही यशस्वीरित्या नोंदणी केली आहे.
- एकदा फॉर्म भरून झाला की काही दिवसा नंतर तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकता.
- त्यासाठी फार्मर कॉर्नर मधील status of self registered or csc farmer या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक आणि captcha टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस तिथं पाहायला मिळतं. यात सगळ्यात शेवटी नोंदणीची तारीख आणि फॉर्मचं स्टेटस दिलेलं असतं.
अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा