नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या लेखामद्धे कांदा चाळ योजना 2022 या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. कांदा चाळ योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आपण या लेखामद्धे बघणार आहोत.
शेतकरी बंधुंनो कांदा चाळ योजना संदर्भात mahadbt web portal ऑनलाईन अर्ज मागवून त्यांना सोडत पद्धतीने लाभ दिला जाणार आहे या संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच जी आर महाराष्ट्र शासनच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे.
शेवटी योजनेचा व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे.
कांदा चाळ योजना 2022 कागदपत्रे
- अर्जदाराच्या नावे स्वत:च्या मालकीची जमिन असावी
- 5 ते 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळासाठी किमान एक हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी 1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असावे.
- तशी कांदा पिकाची नोंद असणारा 7/12 उताऱ्याची प्रत, 8-अ खाते उतारा अर्जासोबत जोडावा.
- वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी देखील अनुदानास पात्र राहील, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थीच्या बाबतीत कर्ज मंजूरचे आदेशपत्र सहपत्रीत करणे आवश्यक आहे.
- कांदाचाळीचा गैरवापर लाभार्थीकडून झाल्यास अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह वसूली लाभार्थीकडून करण्यात येईल.
- लाभार्थीनी कांदाचाळ बांधण्यापुर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात रु.20 च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करुन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा.
- अर्जासोबत खर्चाची मुळ बिले व गोषवारा जोडावा.
- कृषि विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला जोडावा.
- अर्जदारासह कांदाचाळीचा फोटो जोडावा.
आणखी कामाची योजना नवीन विहीर अनुदान सोबतच सौर उर्जा पंप मिळणार GR आला
कांदा चाळ योजना 2022 ऑनलाईन अर्ज प्रोसेस खालीलप्रमाणे
- गुगलच्या सर्च बारमध्ये mahadbt farmer login असा कीवर्ड टाका आणि सर्च करा.
- तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर महाडीबीटी शेतकरी वेब पोर्टल ओपन होईल.
- तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
- तुम्ही नवीन असाल आणि तुमच्याकडे mahadbt web पोर्टलचा शेतकरी लॉगीन आयडी आणि पासवर्ड नसेल तर मात्र मग तुम्हाला नवीन नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करावे लगणार आहे. तुम्हाला जर माहित नसेल कि नवीन नोंदणी कशी करावी तर येथे क्लिक करा.
- लॉगीन झाल्यावर अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
- फलोत्पादन या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
- फलोत्पादन योजनेचा ऑनलाइन अर्ज तुमच्या स्क्रीनवर दिसेल. या ठिकाणी तुम्हाला घटक प्रकार या पर्यायासाठी इतर घटक हा पर्याय निवडायचा आहे.
- बाब या पर्यायखाली दिसत असलेल्या चौकटीवर क्लिक करून कांदा चाळ हा पर्याय निवडायचा आहे.
- सर्वात शेवटी जेवढ्या मेट्रिक टन क्षमतेचे कांदा चाळ हवे असेल ती क्षमता दिलेल्या यादीमधून निवडा.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा.
- योजनेसाठी प्राधान्यक्रमांक निवडा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
आधीक महितीसाठी व्हिडिओ बघा
अशाच विविध शासकीय योजनाची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी खलील लिंक वर टच करून आमच्याशी कनेक्ट व्हा.