गरिबांना मिळणार ५ लाख घरे महाआवास अभियान चा दुसरा टप्पा

मित्रांनो आज राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाआवास अभियान चा दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील ग्रामीण भागातील गरीब जनतेस ५ लाख घरे पक्की घरे महाआवास अभियान अंतर्गत मिळणार आहे. तर ते काश्प्र्कारे मिळणार आहे , जागा बांधायला जागा नसेल तर काय करायचं हे आपण खाली बघणार आहेत.

महाआवास अभियान 2 टप्पा कधी चालू होणार

मित्रांनो हे अभियान अगोदरच चालू झालेले आहे म्हणजेच 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत हे अभियान राबविले जाणार जाणार असल्याची माहिती देखील मंत्री महोदयांनी दिलेली आहे.

या योजनेआंतर्गत दुसऱ्या टप्प्यात झालेली कामे

७५० घरकुले मार्ट.

६३० पेक्षा जास्त गृहसंकुलाचे बांधकाम

१२०० पेक्षा जास्त बहुमजली बिल्डीं.

५०११२ भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून दिलेली आहे.

वरील प्रमाणे महाआवास अभियान ग्रामीण टप्पा १ मध्ये घरे बांधण्यात आल्याची माहिती शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. तसेच पहिल्या टप्प्यामध्ये ४,२५,००० घरकुले भौतिकदृष्ट्या बांधून पूर्ण केली असल्याची माहिती देखील या वेबसाईटवर दिलेली आहे.


Also Read This http://love shayri in Marathi


तुमच्याकडे घर बांधायला जागा नाही

तुम्हाला जर महा आवास अभियान ग्रामीण टप्पा २ अंतर्गत घर मंजूर देखील झाले असेल परंतु घर बांधण्यासाठी जागा, वाळू, रेती आणि इतर साहित्य मिळण्यास अडचण निर्माण होत असेल तर अशा वेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, शासकीय जागा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

योजना लवकर आणि प्रभावीपणे राबविण्यासाठी पुरस्कार

राज्यातील गोरबरीब जनतेच्या स्वतःच्या पक्क्या घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे आणि महा आवास अभियान  टप्पा २ ला अधिक गती मिळावी यासाठी या योजनेमध्ये चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना किंवा संस्थाना पुरस्कार देखील मिळणार आहे. पुरस्कार मिळणार असल्यामुळे नक्कीच संस्था, व्यक्ती या योजनेमध्ये चांगले काम करण्याचा प्रयत्न करेल आणि आपसूकच हि योजना यशस्वी होईल.

महाआवास अभियान

पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी बघा मोबाईलवर

Leave a comment