नवीन जी आर शेतकरी कर्ज माफी साठी १४ जिल्हे लाभार्थी

विदर्भ व मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून म्हणजेच ज्या सावकाराकडे सावकारी करण्याचा शासकीय परवाना आहे. अशा सावकारांकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले असेल तर असे कर्ज शासनातर्फे संबधित सावकारास देऊन शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा शासन निर्णय म्हणजेच जी आर नुकताच महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद अधिकृत वेबसाईटवर आलेला आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये बघणार आहोत

शेतकरी कर्ज माफी साठी १४ जिल्हे लाभार्थी

अत्यंत आनंदाची बातमी आहे. शेतकरी कर्ज माफी GR काढण्यात आलेला आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भातील जी आर म्हणजेच शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल खाली दिलेल्या डाउनलोड करा या बटनाला टच करून तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये करून घ्या.

बँकेचे कर्ज मिळविण्यासाठी कृषी कर्ज मित्र योजना बघा

शेतीसाठी बँकेचे कर्ज काढण्यासाठी अनेक कागदपत्रे जोडावी लागतात आणि ती बँकेत सादर करावी लागतात. मित्रांनो परंतु आता शासनाने कृषी कर्ज मित्र योजना सुरु केलेली आहे ज्यामध्ये शेतकरी बांधवांना कर्ज घेण्यासाठी सर्व कागदपत्रे कृषी मित्र जमा करणार आहेत. या योजनेमुळे शेतकरी बांधवाना लवकर कर्ज मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नक्की या कृषी मित्र योजनेचा लाभ घ्या आणि शेतीसाठी कर्ज मिळवा.


ट्रॅक्टर योजना अनुदान नवीन GR


शेतकरी कर्ज माफी इतर जिल्ह्यांत देखील लागू व्हावी

शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी पैशांची कमतरता भासते. शासनाने शेतकऱ्यांना कर्ज लवकरात लवकर मिळावे यासाठी कृषी कर्ज मित्र हि योजना देखील सुरु केलेली आहे.ज्या पद्धतीने मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडून काढलेल्या कर्जापोटी कर्ज माफी देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने इतर जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना देखील अशीच सुविधा दिली तर नक्कीच त्यांना लाभ होईल.

Leave a comment