नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठी एक खूप चांगली बातमी आहे. ५० हजार अनुदान वाटप लवकरच होणार सुरु. तर हा लाभ कधी आणि कसा मिळणार आहे यासंबंधी पूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेडत आहेत त्यांना ५० हजार अनुदान वाटप केले जाणार आहे.
या संदर्भातील जि. आर. देखील काही दिवसापूर्वी काढण्यात आला होता. आता प्रत्यक्षपणे या निर्णयाची अमलबजावणी सुरु होणार आहे आणि नक्कीच हि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
५० हजार अनुदान वाटप होणार कृषीदिनी
आता सध्या शेतकरी वर्ग शेतीसाठी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झालेली असतांना आता शेतकऱ्यांना कृषी दिनी म्हणजेच १ जुलै रोजी ५० हजार रुपये मिळणार असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात खुश झालेला आहे.शेतकरी बांधवाना शेती करत असतांना बी-बियाणे.
खते व शेतीचे इतर साहित्य खरेदीसाठी पैशांची गरज निर्माण होते. अशावेळी शेतकरी बंधु बँकेकडून कर्ज काढतात नैसर्गिक अप्पातीमुळे त्यांनी काढलेले कर्ज ते वेळेवर परत फेड करू शकत नाही. अशावेळी अशा शेतकऱ्यांचे कर्ज थकले जाते.
उद्धव ठाकरे सरकारने अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. परंतु जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांचे काय असा प्रश्न उभा राहिला होता. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांना ५०,००० अनुदान वाटप करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना Apply Online Mudra Bank Loan 2022
नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळेल ५० हजार अनुदान
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ जुलै २०२२ रोजी ५० हजार रुपयांचे अनुदान वाटप केले जाणार असल्याची बातमी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या संबधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
इतर शेतकऱ्यांची थकीत कर्जे माफत होताना ते बघत असतात. अशावेळी आपण नियमित कर्ज परत फेड करून आपला काहीच फायदा झाला नाही अशी भावना त्यांच्या मनांत निर्माण होऊ शकते. परिणामी एक चांगली सवय शेतकरी बांधवानी बंद होऊ शकते.
असे होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने थकीत झालेल्या शेतकरी बांधवांचे कर्ज माफ करतांनाच जे शेतकरी नियमित कर्ज परत फेड करतील त्यांना प्रोत्साहनपार ५० हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केली होती. यामुळे शेतकऱ्यांना नियमित कर्जाची परतफेड करण्याची सवय लागू शकते जी कि नक्कीच चांगली बाब ठरणार आहे.