पिक विमा नुकसान भरपाई मिळणार कि नाही?

खरच मिळणार आहे का पिक विमा नुकसान मिळणार तर मग केव्हा? हे सुरळीतपणे जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो शासनाच्या निर्णयानुसार पिक विमा नुकसान भरपाई दिवाळीच्या आसपास  मिळेल असे वाटत होते परंतु आता हि बातमी वाचल्यानंतर मनामध्ये शंका निर्माण होत आहे कि खरच पिक विमा दिवाळी पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा नाही?

खर काय जे जाणून घ्या पिक विमा नुकसान विषयी

शेतकरी बांधव सध्या कठीण परिस्थितीला सामोरे जात आहे . एकतर शेतकऱ्यांचे पिकच मोठ्या अडचणीनांचा सामना करून अर्ध्यापर्यंत हाती येते. अर्धे’ पिक जरी हातामध्ये आले तरी एकमेव शेतकरीच असा आहे जो अर्धे पिक हातामध्ये आले तरी खुश होतात. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाल्यास कुठेतरी न्याय मिळाला आहे अशी एक भावना निर्माण होऊ शकते परंतु केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला अजूनही योग्य भाव मिळालेला नाही व तो मिळत पण नाही.


आणखी कामाची योजना चहापत्ती, साबण आता मिळणार राशन दुकान मध्ये बघा GR


शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई मिळणार या आशेवर

मित्रांनो शेतकरी खूप आपल्या शेतामध्ये खूप राब राब राबत असतो, परंतु त्यांनी पिकवलेला पूर्ण माल त्यांच्या हातात येईल त्याची ग्यारंटी नसते. त्यामुळे त्यामुळे शेतकरी दरवर्षी आपल्या पिकाचा पिक विमा काढत असता.नैसर्गिक कारणामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे आपल्या शेतातील मालाचे नुकसान झाले तर पीकविमा नुकसान भरपाई मिळेल या आशेवर शेतकरी असतो.

 शेतकऱ्यांनी दखल केल्या पूर्वसूचना

पंतप्रधान पिक विमा योजनेमधून शेतकऱ्यांनी ३२.५६ लाख पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. त्यामधील १८.१० लक्ष प्रकरणाचे पंचनामे तर १४.४६ लक्ष प्रकरणे प्रलंबित असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पंचनामा झालेल्या ६.८० लक्ष शेतकऱ्यांसाठी ३४७ कोटी रूपये इतकी नुकसान भरपाई निश्चित करण्यात आलेली.

१६ जिल्ह्यातील अंदाजे ४.९४ लक्ष शेतकऱ्यांना २२४ कोटी वाटप करणे अपेक्षित असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती व मध्य हंगाम प्रतिकूल परीस्थिती अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पिक नुकसान वाटप करायचे असल्यास पिक विमाहप्ता अनुदानाचा पहिला हिस्सा केंद्र व राज्य शासनाने देणे बंधनकारक आहे.


आमचा Whatsapp Group


पिक विमा मिळण्यासाठी नुकसान निधीसाठी मागणी करणे आवश्यक.

कृषी विभागाने ९७३ कोटीचा पहिला पिक विमा हप्ता कंपन्यांना दिलेला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यानंतर पिक विमा कंपन्यांनी केंद्र शासनाकडे अनुदान हिश्या पोटी मागणी करणे गरजेचे असते. परंतु केंद्राने पैसे दिल्यानंतर ते शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई पोटी वाटावे लागेल या कारणाने बऱ्याच पिक विमा कंपन्यांनी अद्यापही केंद्र शासनाकडे पिक नुकसान निधीसाठी मागणी केली नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे पिक विमा कधी मिळणार हे सध्या तरी सांगणे शक्य नाही.

Leave a comment