शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आता ठिबक सिंचन मोटार शेततळे फळबाग अनुदान,विहारीवरील विद्युत मोटार आणि अजून बऱ्याच योजनासाठी ६०० कोटी एवढा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
मित्रांनो तुम्ही जर ठिबक सिंचन मोटार शेततळे फळबाग अनुदान,विहारीवरील विद्युत मोटार अशा योजनांची वाट बघत असाल तर मग आता तुमचे वाट बघणे संपले. आता या योजनेसाठी शासनाने सहाशे कोटी निधी देण्याचे ठरवले आहे.
आणखी कामाची योजना ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी मिळणार करा ऑनलाईन अर्ज
ठिबक सिंचन मोटार शेततळे निधी मिळवण्यासाठी काय करायचे?
तर शेतकरी मित्रांनो निधी तर आला पण तो मिळवायचा कसा? असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो. तर हा अर्ज कसा व कुठे करायचा या विषयीची पूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे आणि सर्वात शेवटी एक व्हिडीओची लिंक सुद्धा दिलेली आहे तो व्हिडीओ बघून तुम्ही हा अर्ज करू शकता .
चला मग बघूया अर्ज करण्याची पद्धत
- https://dbt.mahapocra.gov.in/ या वेबसाईटवर जा किंवा डायरेक्ट या वेबसाईटवर जाण्यासाठी येथे टच करा.
- हि वेबसाईट पूर्णपणे ओपन झाल्यावर या ठिकाणी शेतकरी असा पर्याय दिसेल.
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नवीन नोंदणी आणि अर्जदार लॉगीन असे दोन पर्याय दिसेल.
- तुम्ही नवीन शेतकरी असाल तर नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करून घ्या
- आणि तुमची नोंदणी झाली असेल तर तुमचा आधार नंबर टाईप करून लॉगीन करा.
- लॉगीन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवर विविध योजनांची माहिती दिसेल. ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ती योजना निवडा आणि अर्ज करा.
- तुम्हाला अजूनही ऑनलाईन अर्ज करण्याची पद्दत कळली नसेल तर
- खालील लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करण्याचा व्हिडीओ पहा आणि त्यानुसार अर्ज सादर करा.