कृषी कर्ज मित्र योजना नोंदणी ऑनलाईन सुरु

कृषी कर्ज मित्र नोंदणी सुरु झालेले आहे. औरंगाबाद, सांगली व इतर जिल्ह्यामध्ये हि योजना नोंदणी सुरु झालेली आहे.

शेतकऱ्यांना शेती करत असतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. शेती करत असतांना शेतीसाठी लागणारा पैसा नसल्यामुळे अनेक शेतकरी खाजगी सावकाराकडे वळतात. परिणामी कर्जाचे व्याज जास्त झाले कि मग शेतकरी आत्महत्या करण्याकडे वळतो. त्यामुळे शेतीसाठी सुलभरित्या कर्ज उपलब्ध झाले तर नक्कीच शेती फायद्यात येईल आणि शेतकरी सुखी होईल आणि यासाठीच शेतकऱ्यांना कृषी कर्ज सुलभतेने मिळावे यासाठी कृषी कर्ज मित्र योजना शासन राबविणार आहे.

कृषी कर्ज मित्र योजना संदर्भातील जी. आर. बघा.

शेतकऱ्यांना अगदी वेळेवर व सहजरित्या कर्ज उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून प्रत्येक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी कर्ज मित्र हि योजना सुरु होत आहे आणि या संदर्भातील जी. आर. म्हणजेच शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. शासनाचा हा जी आर बघण्यासाठी खालील बटनाला टच करा.

औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी कर्ज मित्र योजनेसाठी खालील प्रकारे आपण नोंदणी करू शकता

  • हि web टाकल्यानंतर या website चा desktop ओपन होईल.
  • त्यामध्ये तुम्हाला कृषी कर्ज मित्र योजना अशी लिंक दिसेल त्या लिंक वर टच करा .
  • टच केल्यानंतर तुम्हाला खालील प्रकारे interface दिसेल
  • असा वरील प्रकारे form ओपन होईल तो तुम्हाला पूर्ण भरायचा आहे.
  • अर्जात भरायच्या बाब खालील प्रमाणे
  1. अर्जदाराचा email id
  2. नंतर त्याचा पासपोर्ट साईझ फोटो.
  3. पूर्ण नाव
  4. निवासाचा पत्ता
  5. व तालुका आणि जिल्हा निवडायचा.
  6. नंतर शैक्षणिक अर्हता म्हणजे आपले शिक्षण किती झाले आहे .
  7. कार्यक्षेत्रातील सहकारी / राष्ट्रीयकृत बँकाची संख्या
  8. स्वाक्षरी ( आपली स्वाक्षरी PDF फॉरमॅट मध्ये अपलोड करायची आहे.)
  9. आणि शेवटी submit या बटनावर click करून form submit करा

जिल्हा परिषद सांगलीसाठी देखील कृषीमित्र योजनेची नोंदणी सुरु

सांगली जिल्हा परिषद अंतर्गत कृषी मित्र योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे खालील लिंकला टच करून तुम्ही डायरेक्ट कृषी मित्र नोंदणी पेजवर जावू शकता.

सांगली कृषी मित्र योजना ऑनलाईन अर्ज

आणि पुढील पद्धत हि वरील सांगितलेल्या माहिती प्रमाणेच भरायची आहे.

मित्रांनो तुम्हाला वरील माहिती वाचून कळाले नसेल तर खालील व्हिडिओ लिंक वर टच करून वीडीओ बघा.

व्हिडिओ लिंक

Leave a comment