शेतकरी मित्रांनो ओपन कास्टसाठी सौर कृषी पंप कोटा उपलब्ध झाला असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा कश्या प्रकारे करायचा या विषयी संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत. बऱ्याच शेतकरी बांधवांना सौर कृषि पंप हा हवा असतो परंतु अनेक जिल्हयातील बहुतेक कोटा संपलेला असतो. सध्या खालील दिलेल्या जिल्हयांचा कोटा उपलब्ध आहे.
सौर कृषी पंप योजने विषयी माहिती
सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अनेक शेतकऱ्यांना ह्या सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्याची इच्छा आहे परंतु ज्या वेळेस शेतकरी ऑनलाईन अर्ज करण्यास जातात त्यावेळी त्या जिल्ह्याचा, तालुक्याचा किंवा गावाचा सोलर पंप योजनेचा कोटा संपलेला असतो त्यामुळे हा अर्ज करता येवू शकत नाही.
परंतु तुमच्या जिल्ह्यासाठी किंवा तालुक्यासाठी प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत कोटा उपलब्ध असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतो. कोणत्या पंपासाठी किती अनुदान मिळते या संदर्भातील माहितीची खालीलप्रमाणे आहे.
ओपन कास्टसाठी सौर कृषी पंपाचा अर्ज पुढे सुरु करण्यापूर्वी जाणून घेवूयात कोणत्या पंपासाठी किती अनुदान मिळते.
पंपाची किमंत
पंपाची क्षमता | 3 एच पी ( डीसी) | 5 एच पी ( डीसी) | 7.5 एच पी ( डीसी) |
किंमत ( जीएसटी मिळून ) | 193803 | 269746 | 374402 |
आणखी कामाची योजना PM kisan Ekyc करणे आवश्यक नाहीतर मिळणार नाही मोदीचे पैसे
या जिल्ह्यासाठी सौर पंपाचा कोटा उपलब्ध.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यासाठी सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध आहे. शेतकरी बंधुंनो एक बाब या ठीकानी लक्षात असू द्या हा कोटा दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी चेक केला असता खालील प्रमाणे कोटा उपलब्ध आहे.
3 HP DC – 713 pumps
5 HP-DC – 388 Pumps
7.5 HP DC – 132 Pumps
वरील प्रमाणे ओपन कास्टसाठी सौर कृषी पंपाचा कोटा दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी चेक केले असता उपलब्ध असल्याचे दिसून आले. मित्रांनो तुम्हाला माहितच आहे कि हा कोटा कधीही कमी किंवा जास्त होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर हा लेख वाचत असाल तर हा कोटा संपण्याच्या आत लगेच सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करून द्या.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे
- https://www.mahaurja.com/ या वेबसाईटला भेट द्या किंवा येथे टच करा
- जेव्हा तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्पुटरवर महाउर्जा वेबसाईट ओपन होईल त्यावेळेस स्क्रीनच्या उजव्या बाजूला महाकृषी उर्जा अभियान कुसुमसौर कृषी पंप अर्ज नोंदणी अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक क्लिक करा.
- https://kusum.mahaurja.com/ या पेजवर तुम्ही रीडायरेक्ट व्हाल याच ठिकाणी तुम्हाला तुमचा सौर कृषी पंपाचा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
ऑनलाईन अर्ज कसा भरावा या संदर्भातील सविस्तर माहिती मराठीमध्ये जाणून घेण्यासाठी येथे टच करा.
विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमच्या WhatsApp आणि telegram group मध्ये सामील व्हा.