Kisan Credit Card योजना २०२२ ऑनलाईन अर्ज

नमस्कार शेतकरी बंधुंनो आज आपण Kisan Credit Card योजना या विषयी माहिती जाणून घेणार आहोत माहिती म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या योजनेचे फायदे काय? कोणकोणती कागदपत्रे लागतात अशा प्रकारची सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.

चला तर मग सर्वप्रथम बघूया किसान क्रेडीट कार्ड योजना चे काय फायदे आहेत.

saur urja kusum yojana सौर ऊर्जा कृषी पंपाचे अर्ज सुरु.

Kisan Credit Card  योजनेचे फायदे.

  • भारतातील कोणत्याही बँकेतील शाखेतून पैसै काढण्याची मुभा.
  • बियाणे, खते इत्यांदींच्या खरेदीत सहकार्यासह व्यापारी किंवा विक्रेत्यांकडून रोख सूट मिळण्यास मदत.
  • कर्जाची परतफेड करण्याची सुलभ प्रक्रिया आणि सर्व शेती आणि त्यासंबंधित कामांसाठी सिंगल क्रेडिट सुविधा.
  • आवश्यक कर्ज मिळवण्यासाठी कमी कागदपत्रे.
  • हंगामी पीक संपल्यानंतर कर्जाची परतफेड करण्याची सुविधा

Kisan Credit Card साठी कोण पात्र आहे?

जर आपण शेतकरी असाल किंवा त्यासंबंधित गटाशी जोडले असाल तर संयुक्त कर्जदार असाल तर तुम्हाला लोन मिळू शकते. तसेच भाडेकरु शेतकरी, किंवा शेतीत भागीदार, तोंडी पट्टेदार यांनी कर्ज मिळू शकते. तर बचतगट किंवा शेअर्स क्रॉपर्स शेतकरी, भाडेकरु इत्यादींचा संयुक्त गटही किसान क्रेडिट कार्डसाठी पात्र आहे.

आणखी कामाची योजना PM kisan Ekyc करणे आवश्यक नाहीतर मिळणार नाही मोदीचे पैसे

किसान क्रेडीट कार्ड नवीन व्याज दर

किसान क्रेडिट कार्ड योजना ही 1998 साली सुरू झाली. कोरोना संसर्गामुळे किसान क्रेडिट कार्डवर सरकारने नवीन व्याज दर जाहीर केला. एका विशेष मोहिमेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील 25 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरित केले आहेत. ज्यासाठी 2 हजार पेक्षा जास्त बँक शाखांना काम सोपवण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत वार्षिक 7 टक्के व्याज दर क्रेडिट कार्डावर भरावा लागेल. किसान क्रेडीट कार्डाद्वारे पीक आणि क्षेत्रासाठी कृषी विमा देखील उपलब्ध आहे.

जर लाभार्थीने 1 वर्षाच्या आत त्याचे कर्ज भरले तर लाभर्थ्याला व्याजदरात 3% सूट आणि 2% सबसिडी मिळेल. याचा अर्थ शेतकऱ्यांना एकूण 5%सूट मिळेल.जर शेतकऱ्याने 1 वर्षाच्या आत कर्जाची परतफेड केली तर त्याला 300000 रुपये पर्यंतच्या कर्जावर केवळ  2% व्याज द्यावे लागेल. जर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

Kisan Credit Card योजनेसाठी ऑनलाईन अर्ज पद्धत.

  • सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर म्हणजे https://pmkisan.gov.in/ या वेबसाईट वर जावे लागेल. नंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
  • मुखपृष्ठावर तुम्हाला Download KCC Form या लिंक वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर तुमच्या समोर Kisan Credit Card Yojana Application Form PDF उघडेल.
  • तुम्हाला Kisan Credit Card Yojana Application Form PDF Download करावा लागेल.
  • तुम्हाला फॉर्म ची प्रिंट काढून त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल.
  • नंतर तुम्हाला अर्जाला आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून ज्या बँक मध्ये तुमचे खाते आहे त्या बँकेत जमा करावा लागेल.
  • नंतर बंकेकडून तुमच्या अर्जाची तपासणी करून तुम्हाला Kisan Credit Card दिल्या जाईल.

बँक माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड काढण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम तुम्हाला ज्या बँकेचे किसान क्रेडिट कार्ड काढायचे आहे त्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • नंतर तुमच्या समोर होम पेज उघडेल.
  • होम पेजवर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड फॉर्मच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला Apply Now या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता अर्ज तुमच्या समोर उघडेल.
  • तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व महत्वाची माहिती जसे की तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इ. भरावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला सर्व महत्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • आता तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.

मित्रांनो तुम्हाला हि वरील माहिती वाचून समजले नसेल त्य या संबंधी व्हिडिओ बघण्यासाठी येथे टच करा.

मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती हि वेळोवेळी मिळत नही तरी खूप शेतकरी हे बऱ्याच योजनांपासून वंचित राहतात. म्हणून शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp group मध्ये सामील व्हा किंवा 9096197462 हा मोबाईल नंबर तुमच्या group मध्ये सामील करा.

WhatsApp group

telegram group

Leave a comment