संजय गांधी निराधार योजना अर्ज या योजनेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. निराधार योजना अर्ज म्हणजे ज्या नागरिकांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेअंतर्गत १००० रुपये प्रती माह लाभ मिळतो. आज आपण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा सदर करायचा यासंबंधी माहिती जाणून घेणार आहोत.
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना या योजनांचा लाभ दिला जातो. ग्रामीण भागामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे. अशा नागरिकांना म्हतारपाणी जीवन जगतांना आर्थिक आधार मिळावा यासाठी हे आर्थिक सहाय्य दिले जाते.
संजय गांधी निराधार योजना अर्ज करण्यसाठी लागणारी कागदपत्रे
- तहसीलदार किंवा तलाठी यांची स्वाक्षरी असलेले रहिवासी प्रमाणपत्र.
- लाभार्थी किंवा अर्जदाराचा रंगीत छायाचित्र.
- ओळखीचा पुरावा म्हणून १ पासपोर्ट २ पॅन कार्ड ३ आधार कार्ड ४ मतदान कार्ड यापैकी एक पुरावा द्यावा लागेल.
आणखी योजना कामची Kisan Credit Card योजना २०२२ ऑनलाईन अर्ज
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे
- आपले सरकार या वेबसाईटवर जावून तुम्हाला नोंदणी करायची आहे.
- तुमची नोंदणी अगोदरच झालेली असेल तर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगीन करायचे आहे.
- तुम्ही नवीन असाल तर New user register here या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल.
- दोन पर्याय तुम्हाला दिसतील
मोबाईल नंबरवर आलेला otp टाकून तुम्ही नोंदणी करू शकता किंवा तुम्ही तुमची सर्व माहिती भरून फोटो व इतर कागदपत्रे अपलोड करून सुद्धा नोंदणी करू शकता.
लॉगीन केल्यावर पुढील प्रोसेस करा.
- वरील पद्धतीने नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- हा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला खालीलप्रमाणे पुढील प्रोसेस करायची आहे.
- कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपले सरकार वेबसाईटचा इंटरफेस दिसेल.
- वेबसाईट इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये दिसेल. जी भाषा तुम्हाला सोपी वाटत असेल ती भाषा निवडा.
- स्क्रीनच्या डाव्या बाजूला अनेक योजना तुम्हाला दिसतील त्या योजनापैकी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हि योजना निवडा.
- या ठिकाणी देखील तुम्हाला अनेक योजना बघावयास मिळतील त्यापैकी विशेष सहाय्य योजना या पर्यायावर क्लिक करा आणिज पुढे या पिवळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
- परत एकदा तुम्हाला विशेष सहाय्य योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील त्याची यादी या ठिकाणी तुम्हाला दिसेल.
- अर्ज भरण्यासाठी पुढे सुरु करा या बटनावर क्लिक करा.
- जसे हित तुम्ही अर्ज सुरु करा या योजनेवर क्लिक कराल या ठिकाणी तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर अर्ज दिसेल. त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा.
ऑफलाईन अर्ज नमुना फाईल डाउनलोड करून घ्या.
मित्रांनो तुम्हाला हि वरील माहिती वाचून व्यवस्थित कळले नसेल तर खालील व्हिडिओ लिंक वर टच करून तुम्ही पूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
ज्या नागरिकांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजने अंतर्गत खालील योजनांचा लाभ मिळू शकतो.
- दिव्यांग व्यक्तींसाठी अपंग निवृत्तीवेतन योजना.
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना.
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना.
- विधवा महिलांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना.
विविध शासकीय योजनाच्या माहितीसाठी आमच्या groups मध्ये सामील व्हा.