प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना pdf downlod करा

आज आपण प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनेविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुमच्या घरात गरोदर महिला असेल तर त्या गरोदर महिलेला या योजनेअंतर्गत अनुदान मिळू शकते.

या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि लाभ किती मिळतो या विषयी आपण जाणून घेणार आहोत.चला तर अगोदर बघूया या योजनेची थोडक्यात माहिती.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना माहिती

योजनेचे नाव प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना
PMMVY शुभारंभ१ जानेवारी २०१७
कोणाकडून राबविली जाते योजना केंद्र शासन
विभागाचे नाव महिला व बाल विकास मंत्रालय.
पात्र व्यक्ती गरोदर महिला.
योजनेचे अनुदान ५००० ते ६००० रुपये.
अधिकृत वेबसाईट लिंक. https://wcd.nic.in/

गरोदर महिलांना मिळते ५००० ते ६००० रुपये अनुदान

ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने शेतकरी वर्ग, अल्प भूधारक, रोजंदार किंवा मोलमजुरी करणारे नागरिक वास्तव्य करत असतात. याला काही गावामध्ये अपवाद देखील असू शकतो मात्र बऱ्याच गावांमध्ये नागरिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो.

अशावेळी एखाद्या शेतकरी कुटुंबामध्ये किंवा अशा कुटुंबामध्ये ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असेल अशा घरामध्ये एखादी गरोदर महिला असेल तर त्या महिलेस प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत ५००० एवढे शासकीय अनुदान दिले जाते. हि एवढी मदत त्यांना खूप फायद्याची ठरेल.

पहिल्या वेळेस गर्भधारण करणारी महिला व स्तनपान करण्याऱ्या महिलेस तीन हफ्त्यामध्ये ६००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • वडील व आई यांचे ओळख पत्र.
  • बाळाचे जन्म प्रमाणपत्र.
  • बँक पासबुक झेरॉक्स प्रत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

योजनेचा लाभ खालीलप्रमाणे

  • पहिला हफ्ता गरोदर राहिल्यानंतर लगेच नोंदणी केल्यावर १००० रुपये.
  • दुसरा हफ्ता महिला गरोदर राहिल्यानंतर ६ महिन्यानंतर चेक केल्यावर २००० रुपये.
  • तिसरा हफ्ता बालकाचा जन्म झाल्यावर जन्माची नोंदणी केल्यानंतर तसेच बाळाचे पहिले लसीकरण पूर्ण झाल्यावर २००० रूपये.

असा या योजनेचा लाभ तीन हफ्त्यामध्ये मिळतो

या योजनेसाठी अर्ज खाली दिलेल्या लिंक वर टच करून तुम्ही अर्ज सादर करू शकता.

फॉर्म A डाउनलोड करा

फॉर्म B डाउनलोड करा.

अशाच अनुदान योजनांच्या माहितीसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा. सामील होण्यासाठी खालील लिंकवर टच करा.

सामील व्हा शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.

Leave a comment