विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र २०२२

मित्रांनो नमस्कार एखाद्या महिलेच्या  पातीचे एखाद्या अपघातमध्ये किंवा काही कारणामुळे निधन झाले तर अशा वेळेस त्या विधवा महिलेचे जीवन हे खूप खडतरीचे असते. या विधवा महिलांना मदत म्हणून शासनाने विधवा पेन्शन योजना सुरू केलेली आहे.

आज आपण या योजनेची पूर्ण माहिती जाणून घेऊया, या योजनेसाठी पात्रता काय आहे, योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि अर्ज कोठे आणि कसा करायचा बघा ही पूर्ण माहिती.

विधवा पेन्शन योजना माहिती

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा ६०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेंतर्गत महिलांना सशक्तीकरण व स्वावलंबी केले जाईल, ज्या अंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाईल.जेणेकरून या गरीब विधवा महिलांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये. आणि त्यांचे वृद्धकाळातील जीवन सोईचे होईल. महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने २३ लाखांचे बजेट तयार केले आहे.

महिलांच्या पतीच्या मृत्यूनंतर योजनेतून मिळालेल्या पेन्शनमुळे ती स्वत: चे आयुष्य जगू शकेल, तीला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. राज्यातील इच्छुक विधवा महिलांना ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर त्यांनी या योजनेंतर्गत अर्ज करावा लागेल. या योजनेंतर्गत राज्यातील विधवा महिलांना शासनाने दरमहा दिलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

आणखी कामाची योजना महिला समृध्दी कर्ज योजना 2022 समाज कल्याण योजना महाराष्ट्र

विधवा पेन्शन योजना पात्रता

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी असावे.
  • अर्जदाराचे बँक खाते असले पाहिजे आणि बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असणे गर्जेचे आहे.
  • अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २१,००० पेक्ष्या जास्त नसावे.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.

विधवा पेन्शन योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • बँक खाते पासबुक.
  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र.
  • उत्पन्न प्रमाणपत्र.
  • पासपोर्ट फोटो.
  • मोबाइल नंबर.
  • वय प्रमाणपत्र.
  • पती मृत्यू प्रमाणपत्र.
  • जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती जमातीची असल्यास ).

विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र लाभ व फायदे

  • या योजनेंतर्गत दरमहा राज्यातील विधवा महिलांना ६०० रुपये पेन्शन रक्कम देण्यात येते.
  • जर एखाद्या कुटुंबात लाभार्थी महिलेला एकापेक्षा जास्त मुले असतील, तर त्या कुटुंबातील महिलेला दरमहा ९००/- रुपये पेन्शन म्हणून मिळते.
  • जर त्या महिलेला फक्त मुली असतील तर, तिची मुलगी २५ वर्षांची किंवा तिचे लग्न झाल्यापासूनही हा फायदा कायम राहील.
  • विधवा महिलेला सरकारने दिलेली रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

विधवा पेन्शन योजना साठी अर्ज कसा व कुठे करावा?

  • अधिकृत वेबसाइटवर गेल्यानंतर मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल, या मुख्य पृष्ठावर आपल्याला महाराष्ट्र विधवा निवृत्तीवेतन योजनेच्या अर्ज पीडीएफ दिली गेलेली आहे.
  • तुम्हाला अर्जामध्ये विचारलेल्या सर्व माहिती भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरुन झाल्यानंतर तुमची सर्व कागदपत्रे आणि तो भरलेला अर्ज जोडून तुम्हाला ती जमा करावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला तो जोडलेला अर्ज आणि कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय / तहसीलदार / तलाठी कार्यालय याठिकाणी जाऊन जमा करावा लागेल.

मित्रांनो अशाच विविध शासकीय योजनाच्या महितीसाठी आमच्याशी कनेक्ट व्हा खलील लिंक वर टच करा.

कनेक्ट व्हा – शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.

Leave a comment