स्वाधार योजना माहिती PDF अर्ज 

महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती (एससी) आणि नव बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना 2021 (Swadhar Yojana Maharashtra) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी, पदविका आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सरकारकडून दरवर्षी 51,000 रुपयांची आर्थिक मदत मिळेल. ही मदत त्यांच्या राहण्या-खाण्याच्या आणि इतर खर्चासाठी दिली जाईल.

एससी आणि एसटी समाजातील गरीब आणि वंचित उमेदवारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र समाज कल्याण विभाग महाराष्ट्र स्वाधार योजना राबवत आहे. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला स्वाधार योजना माहिती जसे की- स्वाधार योजनेचा उद्देश, महाराष्ट्र स्वाधार योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत मिळणारा लाभ आणि फायदे, तसेच अर्ज प्रक्रिया या बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत.

स्वाधार योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  • रहिवासी दाखला.
  • बँक खाते.
  • जातीचे प्रमाणपत्र.
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
  • मोबाइल क्रमांक
  • पासपोर्ट फोटो.

आणखी कामाची योजना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना २०२२

स्वाधार योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

सुविधाअनुदान
बोर्डिंग28,000
निवास15,000
मेडिकल आणि इंजीनीरिंग अभ्यासक्रमासाठी 5,000 अतिरिक्त
इतर खर्च  8,000
इतर शाखांसाठी 2,000 अतिरिक्त
एकूण51,000

पात्रता

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदार हा एसटी किंवा एससी प्रवर्गातील असावा.
  • अर्जदारच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 25000 पेक्षा कमी असावे.
  • अर्जदारकडे बँक खाते असावे.
  • दहावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायला हवा. आणि अभ्यासक्रमाचा कालावधी हा 2 वर्षांपेक्षा कमी नसावा.
  • मागील वर्षीच्या परीक्षेत अर्जदारला 60% पेक्षा कमी गुण नसावे.
  • अपंग गटातील अर्जदारला कमीत कमी 40% गुण मागील परीक्षेत असावे.

स्वाधार योजनेचे लाभ

  • स्वाधार योजनेचे लाभ फक्त अनुसूचीत जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना घेता येईल. इतर जातीतील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत.
  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार कडून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 51,000 ची आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्या जाते.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना राहण्याची आणि खाण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाते.

Swadhar Yojana Application Form

महाराष्ट्र सरकार कडून स्वाधार योजना 2021 साठी कोणत्याही प्रकारची ऑनलाइन अर्ज प्रणाली उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. लाभर्थ्यांना जर स्वाधार योजना 2021 साठी अर्ज करायचा असेल तर तो ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.  Swadhar Yojana Application Form Pdf तुम्हाला डाऊनलोड करावा लागेल. डाऊनलोड लिंक आम्ही खाली दिलेली आहे. अर्ज डाऊनलोड केल्यावर तुम्हाला त्याची प्रिंट काढून आवश्यक सर्व माहिती भरून कागदपत्रे अर्जाला जोडावी लागतील. आणि नंतर तुमच्या समाज कल्याण विभागामध्ये तो अर्ज जमा करावा लागेल.

मित्रांनो विविध शासकीय योजनाच्या महितीसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

ग्रुप लिंक

Leave a comment