नमस्कार मित्रांनो आपण आज या लेखामध्ये अण्णासाहेब पाटील कर्ज योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. माहिती म्हणजे या योजनेसाठी पत्र कोण आहे, योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, कर्जाची भेटणारी रक्कम आणि किती टक्के व्याजदरणे मिळणार आहे ही रक्कम या सर्वांची माहिती आज आपण येथे बघणार आहोत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ साठी ३० कोटी रुपये निधी वितरण करण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. तो तुम्ही खाली GR बघा या बटणावर टच करून बघू शकता.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- जातीचा दाखला.
- आधार कार्ड.
- रहिवासी पुरावा.
- उत्पन्नाचा पुरावा
आणखी कामाची योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना संदर्भातील महत्वाचे मुद्दे.
- केवळ मराठाच नव्हे तर ज्या जातीसाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नाही अशा जातीचे उमेदवार देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतील.
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी ८ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणे गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- पुरुषांसाठी जास्तीत जास्त ५० तर महिलांसाठी ५५ वर्षे वायोमर्यादा आहेत.
- ५ वर्षाकरिता किंवा किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी यापेक्षा जे कमी असेल तितक्या वर्षापर्यंत लाभ मिळेल.
- कर्ज मर्यादा रक्कम १० लक्ष असेल आणि व्याजाचा दर द. सा. द. शे. १२ टक्के एवढा असेल आणि जास्तीत जास्त ३ लाख रुपयापर्यंत व्याज रकमेचा परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्याकडून करण्यात येईल.
- अर्ज केल्यानंतर ७ दिवसाच्या आत ( सुट्टीचे दिवस वगळून ) लाभार्थ्यास अर्जासंदर्भात प्रतिक्रिया कळविली जाईल.
- लाभार्थ्याने व्यवसाय सुरु केल्यानंतर ६ महिन्यामध्ये त्या व्यवसायाचे दोन फोटो वेबसाईटवर अपलोड करणे गरजेचे आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्ज
मित्रांनो या योजनेसाठी आता ऑनलाइन सुद्धा अर्ज करता येतो. तेही आपण स्वतः आपल्या मोबाईल वरुण करू शकतो.
तर या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा याविषयी जाणून घेण्यासाठी खलील व्हिडिओ बघा.
मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी शासन हे विविध शासकीय योजनाच्या माध्यमांतून अनुदान वितरित करत असते परंतु बर्याच शेतकरी मित्रांना अनुदान योजनांची माहिती वेळेवर मिळत नाही या कारणामुळे बरेच शेतकरी अनुदान योजनांपासून वंचित राहतात.
विविध शासकीय योजनांची माहिती वेळेवर आपल्या मोबाईल वर मिळवण्यसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा खलील लिंक वर टाच करा