दीनदयाल अंत्योदय योजना 2022 ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे दीनदयाल अंत्योदय योजना 2022 या योजनेविषयी माहिती जाणून घेऊया. ही योजना राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन आणि राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनचे एकत्रीकरण आहे. मित्रांनो, या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Deendayal Antyodaya Yojana Maharashtra 2022 बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत जसे की- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे इत्यादि,

विहीर मोटार अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज

दीनदयाल अंत्योदय योजना

या मिशन अंतर्गत, ग्रामीण भागातील सामुदायिक संस्थांद्वारे गरीब लोकांना उपजीविकेचे विविध स्त्रोत उपलब्ध करणे आणि ग्रामीण भागातील गरीब लोकांची गरिबी दूर करणे हा उद्देश आहे. तसेच या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 10 लाख लोकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम राज्यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. हे मिशन 2011 मध्ये सुरू करण्यात आले. राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन 29 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशातील 586 जिल्ह्यांतर्गत 4,459 ब्लॉक्समध्ये लागू करण्यात आले आहे. 2017-18 आर्थिक वर्षात 1.28 लाख ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यापैकी 69,320 तरुणांना चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला आहे.

दीनदयाल अंत्योदय योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मतदार ओळखपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकार फोटो

कडबा कुट्टी मशीन योजना सुरू करा ऑनलाईन अर्ज

ऑनलाइन अर्ज

  • तुम्हाला जर दीनदयाल अंत्योदय योजने साठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर सर्वात आधी अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल त्यासाठी https://aajeevika.gov.in/ या वेबसाईट वर जा.
  • वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
  • मुखपृष्ठावर तुम्हाला LOGIN या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • नंतर नवीन पृष्ठ उघडेल नवीन पृष्ठावर तुमच्या समोर Login Form उघडेल Login Form च्या खाली Register Now असा पर्याय असेल तुम्हाला त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • नवीन पृष्ठावर तुमच्या समोर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल, या फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल.
  • माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला Submit या बटन वर क्लिक करावे लागेल.

मित्रांनो आपल शासन हे शेतकरी बांधवांसाठी अनेक प्रकारचे अनुदान योजना काढत असते. शासकीय योजनांची माहिती मिळवा आपल्या मोबाईलवर त्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील खलील ग्रुप लिंकला टच करा.

ग्रुप लिंक

Leave a comment