जमिनीचा फेरफार उतारा ऑनलाईन असा पाहा

नमस्कार मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सातबारा, नमूना नं. 8, जमिनीचा फेरफार उतारा ही कागदपत्रे गरजेची असते आणि आता ही सर्व कागदपत्रे ऑनलाइन आपल्या मोबाईलवर सुद्धा बघू शकता. तर आपण आज जमिनीचा फेरफार उतारा ऑनलाईन कसा बघायचा याविषयी माहिती जाणून घेऊया.

गावपातळीवर फेरफार म्हणजेच गाव नमुना-6 अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या जमीन अधिकार अभिलेखात जे बदल होतात, त्याची नोंद फेरफारात ठेवली जाते.

फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते.आता तुम्हाला घरबसल्या तुमच्या गावातील फेरफार नोंदीची माहिती ऑनलाईन पाहता येणार आहे.जमिनीचा फेरफार उतारा ऑनलाईन पद्धत खालीलप्रमाणे

आणखी कामाची योजना PM kisan Ekyc करणे आवश्यक नाहीतर मिळणार नाही मोदीचे पैसे

जमिनीचा फेरफार उतारा ऑनलाईन बघण्याची पद्धत

  • फेरफार ऑनलाईन पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे.
  • त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. या वेबसाईटवर उजवीकडे आपली चावडी नावाचा पर्याय तुम्हाला दिसेल.
  • त्यावर क्लिक केल्यास आपली चावडी (Digital Notice Board) नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
  • आता तुमच्या गावातील फेरफार नोंदी कशा जाणून घ्यायच्या ते पाहूया.
  • या पेजवर जिल्हा निवडा हा पर्याय आहे.
  • त्याखालील जिल्हा या रकान्यासमोर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका या रकान्यासमोर तालुका निवडायचा आहे, तर गावाच्या रकानासमोर गावाचं नाव निवडायचं आहे.
  • ही माहिती भरून झाली की “आपली चावडी पहा” या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • यामध्ये फेरफार नंबर सुरुवातीला दिलेला असतो.

आमच्याशी कनेक्ट व्हा

जमिनीचा फेरफार उतारा ऑनलाईन
  • त्यानंतर फेरफाराचा प्रकार म्हणजे शेतमजिनीवर बोजा चढवला किंवा कमी केला आहे काय, वारस नोंद केली आहे काय, जमीन खरेदी केली आहे काय, याप्रमाणे प्रकार नोंदवलेला असतो. त्यापुढे फेरफाराचा दिनांक, हरकत नोंदवण्याचे शेवटची तारीख आणि ज्या सर्वे किंवा गट क्रमांकशी संबंधित जमिनीचा व्यवहार झाला आहे तो सर्वे किंवा गट क्रमांक यांची माहिती दिलेली असते.
  • यासमोरील ‘पहा’ या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • गाव नमुना-९ म्हणजेच फेरफाराची नोटीस असे या पेजचे नाव आहे.
  • आता ही फेरफार नोटीस तीन रकान्यांत विभागलेली असते.
  • यामदील पहिल्या रकान्यात फेरफारचा नंबर दिलेला असतो. त्यानंतर दुसऱ्या रकान्यात जमीन संपादित केलेल्या अधिकारांचे स्वरूप सांगितलेले असते.
  • यामध्ये जमिनीचा कोणत्या प्रकारचा व्यवहार झाला आहे आणि तो कोणाकोणामध्ये झाला आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते. तसेच पुढे हा व्यवहार कोणाकोणाच्यात झाला याची माहिती दिली आहे.
  • यानंतर तिसऱ्या रकान्यात ज्या शेतजमिनीवरील अधिकार संपादित केले आहेत, त्या शेतजमिनीचा गट क्रमांक दिलेला असतो.
  • त्यानंतर खाली या फेरफार नोंदी संदर्भात काही हरकत असल्यास ती स्थानिक तलाठ्याकडे १५ दिवसांच्या आत कळवावी. अन्यथा तुमची कोणतीही हरकत नाही, असे समजले जाईल, अशी सुचना तिथे दिलेली असते.

अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा या लिंक ला टच करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता.

आपल्या जमिनीचा ऑनलाइन भू नकाशा बघण्यासाठी खलील लिंक ला टच करा.

ऑनलाइन भू नक्शा

Leave a comment