कुक्कुटपालन शेळीपालन शेड अनुदान अर्ज

नमस्कार शेतकरी बंधूंनो ग्रामीण बघातील शेतकरी हे आता फक्त शेतीवरच अवलंबून राहिलेले नाही तर शेतीसोबतच कुक्कुटपालन, शेळीपाळण व दुग्धव्यवसाय असे काही जोडधंदे करीत आपला संसार चालवत आहे. आता शासनही या शेतीसोबतच जोडधंदा करणार्‍या उत्सुक शेतकर्‍यांना अनुदान देत असते. आणि आता  कुक्कुटपालन शेळीपालन शेड अनुदान सुद्धा देत आहे त्याच संबंधी आज आपण माहिती जाणून घेऊया.

शेळीपालन किंवा कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे शेळ्यांसाठी गोठा होय. चांगला निवारा नसेल तर शेळ्या किंवा मेंढ्यामध्ये विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. जसे कि जंतजन्य, संसर्गजन्य, बाह्यपरजीवी प्रादुर्भाव इत्यादी.

कुक्कुटपालन शेळीपालन शेड अनुदान मिळालेले शेड खालीलप्रमाणे असेल

  • १० शेळ्यांच्या गटासाठी  ७.५० चौरस मीटरचा शेड.
  • शेडची लांबी ३.७५ मी. व रुंदी २ मी.
  • चार भिंतीची उंची सरासरी २.२० मीटर असणे आवश्यक.
  • भिंतीसाठी सिमेंट व विटांचे प्रमाण १:४ असावे.
  • शेडच्या छतास लोखंडी तूळ्यांचा आधार देण्यात यावा.
  • छतासाठी सिमेंट किंवा गॅल्व्हनाईज्ड पत्रे वापरणे आवश्यक.
  • ताळासाठी मुरूम वापरावा.
  • शेळ्यांना पिण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम.

कुक्कुटपालन शेळीपालन शेड अनुदान मिळणारा

शेळीपालनसाठी शेडचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून नरेगा योजना अंतर्गत ४९,२८४.०० एवढा निधी मिळणार आहे. रोजगार हमी योजना अंतर्गत हे शेळीपालन शेड बांधकाम करण्यात येणार असून खर्च खालीलप्रमाणे राहणार आहे.

कुशल खर्च४५,०००.००
अकुशल खर्च४२८४.००
एकूण खर्च४९,२८४.००

शासन निर्णयानुसार खालील प्रमाणे कुक्कुटशेड बांधकाम असेल.

  • १०० पक्षी एकत्र व्यवस्थित राहण्यासाठी ७.५० चौरस मीटरचा निवारा पुरेसा आहे.
  • लांबी ३.७५ मीटर. व रुंदी २ मीटर.
  • लांबीकडील बाजूस ३० सेमी उंच व २० सेमी जाडीची विटांची जोत्यापर्यंत भिंत असावी
  • ३० बाय ३० सेमीच्या खांबांनी आधार दिलेली छतापर्यंत कुक्कुटजाळी.
  • आखूड बाजूस २० सेमी जाडीची सरासरी २.२० मीटर उंचीची भिंत असावी.
  • तळ्याच्या पायासाठी मुरुमाची भर घालावी त्यावर दुय्यम दर्जाच्या विटा व सिमेंटचा मजबूत थर असावा.
  • पक्षांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे गरजेचे.

कुक्कुटपालन शेळीपालन शेड अनुदान अनुदान मिळविण्यासाठी या योजनेसाठी लागणारा प्रस्ताव अंदाजपत्रक व इतर महत्वाच्या बाबी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करा. त्या प्रस्तावाची प्रिंट काढा आणि तुमच्या ग्रामपंचायतला सादर करा. शरद पवार ग्राम समृद्धी योजनेतून या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे.

प्रस्ताव डाउनलोड करा.

आणि अजून कुक्कुटपालन योजनेसाठी तुम्ही अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता तेही ऑनलाइन अर्ज करून अर्ज करण्यासाठी खलील लिंक ल टाच करा

कुक्कुटपालन अनुदान योजना ऑनलाइन अर्ज

अशाच विविध शासकीय योजनांच्या महितीसाठी आमच्याशी कनेक्ट व्हा त्यासाठी खलील ला टच करा.

ग्रुप लिंक

Leave a comment