नमस्कार शेतकरी बंधूंनो आता पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला शासकीय अनुदानावर बियाणे हवे असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करून द्या कारण बियाणे अनुदान योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. तरी या योजनेचा भरपूर शेतकर्यांनी फायदा घ्यावा. चला तर मित्रांनो आता आपण बघूया या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करतात.
बियाणे अनुदान योजना 2022 आवश्यक असणारी कागदपत्रे
- 8-अ प्रमाणपत्र.
- 7/12 प्रमाणपत्र.
- खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन (पंप, पाईप, शेततळे या घटकांकरीता).
- केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी).
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थींसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- हमीपत्र.
- पूर्वसंमती पत्र.
आणखी कामाची योजना डीजल पंप अनुदान योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरु.
बियाणे अनुदान योजना 2022 ऑनलाइन अर्ज पद्धत खालीप्रमाणे
- mahadbt शेतकरी पोर्टलला भेट द्या.
- लॉगीन करा.
- लॉगीन केल्यावर अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
- दिसणाऱ्या अनेक योजनांपैकी बियाणे औषधे व खते या पर्यायासामोरील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारच्या बियाण्यांसाठी अर्ज करता येतो.
- ) पिक प्रात्यक्षिक बियाणे
- ) प्रमाणित बियाणे.
- पिक प्रात्यक्षिक बियाण्यास १०० टक्के अनुदान दिले जाते
- प्रमाणित बियाण्यांसाठी जास्तीत जास्त ५० टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.
- बियाणे औषधे व खते योजनेचा अर्ज ओपन झाल्यावर योग्य ती माहिती भरा.
- विविध पिकांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
- अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.
- पहा या बटनावर क्लिक करून योजनेस प्राधान्य द्या.
- अर्ज करा या बटनावर क्लिक करताच 23.60 एवढी फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
- दिलेल्या पेमेंटचा पर्याय वापरून पेमेंट करा.
- पेमेंट पावतीची प्रिंट काढून घ्या.
- अशा पद्धतीने तुम्ही बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
शेतीसाठी लागणाऱ्या बियाण्यांच्या व खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. अशावेळी जर तुम्ही शासकीय अनुदानावर बियाणे खरेदी केले तर नक्कीच तुमच्या खर्चाची बचत होऊ शकते.
मित्रांनो अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा.
शेतकरी बंधूंनो शासन हे अशाप्रकारे खूप योजना आपल्या शेतकरी मित्रांसाठी काढत असते. तरी काहीच शेतकरी या योजनांचा लाभ घेतात कारण बर्याच शेतकरी बांधवांना माहीतच नसत कोणती योजना आली, कोणती योजना सध्या चालू आहे. आणि कधी कधी कळते ते वेळ, तारीख संपल्यानंतर. तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खलील आमच्याशी कनेक्ट व्हा या बाटनावर क्लिक करून आम्हाला सामील करा असा संदेश पाठवा.