Land Purchase Loan SBI शेत खरेदी कर्ज योजना 2022  

नमस्कार शेतकरी बंधूंनो sbi बॅंकने सुरू केलेली Land Purchase Loan SBI शेत खरेदी कर्ज योजना ही योजना ज्या शेतकर्‍यांना जमीन विकत घ्यायची आहे परंतु काही आर्थिक अडचणीमुळे ते घेऊ शकत नाही अशा शेतकरी मित्रांना या योजनेचा खूप फायदा मिळेल. एसबीआय लोन स्कीमसाठी कोण पात्र आहेत. कोणकोणते कागदपत्रे लागतात हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.  

Land Purchase Loan SBI किती टक्के रक्कम मिळेल

जे शेतकरी लहान आहेत म्हणजेच अल्प भूधारक आहेत किंवा ज्यांच्याकडे जमीनच नाही अशा मजुरांना Sbi loan scheme चा फायदा होऊ शकतो. हे कर्ज घेण्यासाठी लाभार्थी किंवा शेतकरी बँकेचा ग्राहक असणे गरजेचे आहे म्हणजेच त्या शेतकऱ्यांचे खते sbi bank मध्ये असणे आवश्यक आहे.

शेतकरी बांधवाला जमीन खरेदी करण्यासाठी शेताच्या निश्चित मूल्याच्या ८५ टक्के रक्कम बँकेकडून मिळते हे स्टेट बँकेच्या जमीन खरेदी योजनेचे खास वैशिष्ट्य आहे.शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी जे लोन मिळणार आहे ते जास्तीत जास्त ५ लाख रुपये आहे. पण यासाठी ८५ टक्के शेताची किंमत sbi बँक ठरवत असते.

आणखी ही योजना पण बघा प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना Apply Online Mudra Bank Loan 2022

या लोन साठी पात्र कोण असेल

  • ज्या शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे किंवा ज्या शेतकऱ्यांकडे २.५ एकर शेत आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदाराची बँकेत चांगली पत असावी म्हणजेच कर्जदाराने नियमित कमीत कमी दोन वर्षे कर्जाची परतफेड केलेली असणे आवश्यक आहे.

कर्जाची परतफेड करण्याची पद्धत खालीलप्रमाणे

  • शेत खरेदी कर्ज योजना अंतर्गत जमीन खरेदी करण्यासाठी घेतलेले लोन फेडण्यासाठी जास्तीत जास्त १० वर्षाचा कालावधी शेतकऱ्यांना दिला जातो.
  • शेतकरी या लोन ची परतफेड सहा माही हफ्त्यामध्ये करू शकतात.
  • अगोदरच विकसित केली गेली असेल तर उत्पादनाचा कालावधी जास्तीत जास्त १ वर्षाचा असेल जमीन
  • जी जमीन उत्पादनक्षम नाही त्यासाठी पूर्व उत्पादन कालावधी २ वर्षाचा असतो.
  • एसबीआय जमीन खरेदी योजनेतून जमीन घेतल्यास उत्पादन सुरु होण्यापूर्वीच्या विहित कालावधीत शेतकरी बांधवाना कोणताही हफ्ता भरावा लागत नाही.

शेतकरी बंधूंनो आम्हाला अशा आहे की ही वरील माहिती वाचून तुम्हाला या लोन विषयीची पूर्ण माहिती व्यवस्थित समजली असेल आणि तुम्हाला अजून सविस्तर माहिती हवी असेल तर आम्ही खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता.

अधिकृत वेबसाइट

अशाच विविध शासकीय योजनाची माहिती आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी खलील लिंकला टच करून आम्हाला नमस्कार करा.

आमच्याशी कनेक्ट व्हा

Leave a comment