मल्चिंग पेपर अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे मल्चिंग पेपर अनुदान योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. शेतीसाठी मल्चिंग पेपर खूप मोठ्या प्रमाणत वापरला जात आहे. mulching paper वापरल्यामुळे शेतामध्ये जास्त प्रमाणत तण होत नाही परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाचतो.

मल्चिंग पेपर बाजारातून विकत घेण्यासाठी तुम्हाला बरेच पैसे मोजावे लागतात. आर्थिक अडचणीमुळे सर्वच शेतकरी त्यांच्या शेतामध्ये मल्चिंग पेपर वापरू शकत नाहीत. परंतु महाडीबीटी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून मल्चिंग पेपर खरेदी करण्यासाठी तुम्ही शासकीय अनुदान मिळवू शकता

आणखी आमची योजना बियाणे अनुदान योजना 2022 ऑनलाइन अर्ज सुरु.

मल्चिंग पेपर अनुदान योजना मल्चिंग पेपरचे फायदे

  • बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबवते.
  • जमिनीत हानीकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो आणि तणाच्या वाढीस प्रतिकार होतो कारण सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही.
  • मल्चिंग फिल्म जमिनीचे तापमान वाढते त्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते.
  • आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते, ज्यात कार्बोन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक असते.
  • भुईमुगासारख्या पिकाकरीत मल्चिंग फिल्म वापरल्यास मुळांवरील गाठीचे प्रमाण वाढते आणि सूत्रकृमींचे प्रमाण कमी होते.मल्चिंग फिल्ममुळे पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप थांबते.
  • मल्चिंग मुळे जमिनीचे तापमान वाढते त्यामुळे जमीन निर्जंतुक करण्यास मदत होते.
  • पेपरखाली सूर्यकिरण पोचत नसल्याने तण वाढ होत नाही.

मल्चिंग पेपर अनुदान योजना असा करा ऑनलाइन अर्ज

  • युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
  • फलोत्पादन या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
  • एक अर्ज तुमच्या स्क्रीनवर दिसेल त्यामध्ये योग्य ती माहिती भरा. जसे कि प्लास्टिक हा पर्याय निवडा.
  • जेवढ्या क्षेत्रावर तुम्हाला मल्चिंग हवी आहे ते क्षेत्र टाका आणि अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर योजनांना प्राधान्य क्रमांक द्या. प्राधान्य क्रमांक म्हणजे तुम्हाला कोणती योजना अगोदर हवी आहे आणि ती योजना नाही मिळाली तर त्याव्यतिरीक्त इतर कोणती योजना हवी आहे त्यासाठी प्राधान्य क्रमांक द्या.
  • ती योजना नाही मिळाली तर त्याव्यतिरीक्त इतर कोणती योजना हवी आहे त्यासाठी प्राधान्य क्रमांक द्या.
  • सर्वात शेवटी अर्ज सादर करा.
  • तुम्ही जर नवीन असाल तर २३.६० पैसे एवढी पेमेंट तुम्हाला ऑनलाईन करावे लागते ते करून द्या.

आमच्याशी कनेक्ट व्हा.

अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा.

Leave a comment