नमस्कार मित्रांनो आता प्रतेक सातबारा धारकांच्या सातबारा उतार्यावर मोबाइल नंबर दिसणार आहे आणि मोबाइल नंबर सोबतच ई-मेलची सुद्धा नोंदणी करण्यात येणार. या पद्धतीमुळे जमीन खरेदी विक्री मध्ये होणारे घोटाळे म्हणजेच गैरव्यवहार होणार नाही.
हेही वाचा digital 7/12 आता अगदी काही मिनिटातच तुमच्या मोबाईल मध्ये
सातबारा उतार्यावर मोबाइल नंबर येणार याचा काय फायदा होईल
मित्रांनो आपल्या राज्यात सुमारे 2 कोटी 56 लाख येवढे सातबारे आहेत. आता सर्व सातबारे हे डिजिटल झालेल आहे तरीसुद्धा गेल्या काही वर्षात जमीन खरेदी विक्री करता वेळेस खूप काही गेरव्यवहार झाल्याच्या बातम्या आहेत.हे असले गैरव्यवहार होऊ नये यासाठी ही पद्धत फायद्याची ठरणार आहे.
जमिनीवर एखाद्या कुठल्याही बँकेचा बोजा असल्यास त्याची माहिती जमीन घरेदी विक्रीच्या वेळेस कळावी आणि त्याचबरोबर तलाठी किंवा एखाद्या महसूल विभागातील अधिकार्यांना एखाद्या सातबारा धारकाशी संपर्क साधायचा असेल तर ते अधिकारी त्या सातबारा धारकाच्या सातबार्यावर असलेल्या मोबाइल नंबर किंवा ईमेल वरुण संपर्क करू शकेल यामुळे गैरव्यवहार होणार नाही.
मित्रांनो आपल शासन हे आपल्या शेतकरी मित्रांसाठी खूप योजना काढत असते परंतु शेतकरी मित्रांना या योजनाची माहिती ही वेळेवर मिळत नाही किंवा मिळतही नाही. यामुळे खूप शेतकरी या योजनांपासून वंचित राहता. तुम्हाला जर या योजनाची माहिती वेळेवर आपल्या व्हाट्सअॅप वर मिळवण्यासाठी खलील फोटोला टच करा किंवा येथे क्लिक करा.