पीक विमा योजनेत बीड पॅटर्न लागू काय आहे बीड पॅटर्न पहा सविस्तर

पीक विमा योजनेत बीड पॅटर्न लागू करण्यात राज्य मंत्री मंडळाने दिली मान्यता , काय आहे बीड पॅटर्न , त्याच बरोबर विमा हप्ता भरण्यास 31 जुलाईपर्यंत मुदत मिळाली आहे. 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखात प्रधानमंत्री पीक विमा याजनेमध्ये बीड पॅटर्न लागू करण्यात आला आहे बीड पॅटर्न काय आहे आणि का लागू करण्यात आला आहे त्याची सविस्तर माहिती आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. 

पीक विमा योजनेत बीड पॅटर्न लागू करण्यात राज्य मंत्री मंडळाने दिली मान्यता , काय आहे बीड पॅटर्न , त्याच बरोबर विमा हप्ता भरण्यास 31 जुलाईपर्यंत मुदत मिळाली आहे. 

हे देखील वाचा : खरीप पीक विमा योजना ऑनलाईन अर्ज भरणे सुरू online arj 2022

पीक विमा योजनेत बीड पॅटर्न लागू 

राज्यात 12 जिल्हा समुहमध्ये ही योजना राबविताना विमा कंपन्या एक वर्षामध्ये त्या त्या जिल्हा समूहाच्या एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या फक्त 110 टक्क्यापर्यंत दायित्व स्वीकारतील. 

विमाभरपाईची रक्कम जमा विमा हप्ता रकमेच्या 110 टक्क्यापेक्षा जास्त असल्यास आता जास्तीच्या रकमेचा सर्व भाग राज्य शासन उचलणार आहे. 

असा असेल बीड पॅटर्न  

बीड पॅटर्न लागू करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी कृषिमंत्री दादाजी भुसे, आणि कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. 

या पॅटर्ननुसर भरपाईची रक्कम विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असल्यास विमा विमा कंपनीला केवळ कमाल 20 टक्के रक्कम स्वतःकडे ठेवता येईल. म्हणजेच 80 टक्के रक्कम कंपनीला पुन्हा शासनाकडे जमा करावी लागले. 

राज्यात शासनाने लागू केलेल्या शासकीय निर्णयात शेतकाऱ्याने विमा हप्ता म्हणून खरीप हंगामसाठी भरायची रक्कम 2 टक्के ठेवली आहे. 

तसेच यापूर्वीसारखीच रब्बीसाठी दीड टक्के तर दोन्ही हंगामधील नगदी पिकासाठी हप्ता रक्कम 5 टक्के ठेवली आहे. दोन्ही हंगामातील सर्व पिकासाठी समान म्हणजेच 70 टक्के एवढा ठेवण्यात आला आहे. 

हे देखील वाचा : सावित्रीबाई फुले घरकुल योजना आली १.२० लाख रुपये निधी मिळणार

कोणत्या जिल्ह्यात कोणती विमा विमा कंपनी काम करणार

  • नगर, नाशिक, चंद्रपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर [एचडीएफसी एग्रो – टोल फ्री क्र. 1800 366 0700] 
  • सोलापूर, जळगाव, सातारा, औरंगाबाद, भंडार, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद [भारतीय कृषि विमा कंपनी- टोल फ्री क्र. 1800 419 5004] 
  • परभणी, वर्धा, नागपूर, हिंगोली, अकोला धुळे, पुणे [आयसीआयसीआय लोंबर्ड – टोल फ्री क्र. 1800 103 7712]
  • नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग [ युनाटेड इंडिया – टोल फ्री क्र. 1800 233 5555]
  • बीड [ बजाज लाईन्स – टोल फ्री क्र. 1800 209 5959] 

आमच्याशी कनेक्ट व्हा

बीड पॅटर्नमध्ये या पिकाचा समावेश

चालू खरीप बीड पॅनटर्नमध्ये धान, खरीप ज्वारी, बाजारी, राई, मुंग, उडीद, तूर, मक्का, भुईमुंग, काराळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, आणि खरीप कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. 

संबंधित बातमीपत्र  वाचा

Leave a comment