एक गाव एक वाण योजना सुरु

नमस्कार मित्रांनो २०२२ पासून महाराष्ट्र राज्य कृषी खात्याने एक गाव एक वाण ek gav ek van योजना सुरु केली आहे. या योजना अंतर्गत कापसाच्या पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ७ हजार अनुदान मिळेल तर सोयाबीन पिकासाठी ६,५०० एवढे अनुदान दिलेलं जाणार आहे.

महाराष्ट्रा राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र कृषी विभाग विविध योजना राबवीत असतात. यापैकीच एक योजना म्हणजे एक गाव एक वाण ek gav ek van योजना होय.

आमच्याशी कनेक्ट व्हा

एक गाव एक वाण योजना संदर्भात सविस्तर माहिती पहा

जालना जिल्ह्यासाठी सोयाबीनच्या पिकासाठी २००० हेक्टर तर कापूस पिकासाठी २६०० क्षेत्रासाठी हि योजना राबविण्यात येणार आहे. हि योजना महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यासाठी लागू आहे.

तुम्ही जर जालना जिल्ह्याच्या बाहेरील शेतकरी असाल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेसंदर्भात आधीक माहिती जाणून घ्यावी लागणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईनअर्ज सादर करावा लागणार आहे हि बाब शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी.

अशी आहे एक गाव एक वाण योजना

ज्या गावांची या योजनेसाठी निवड करण्यात आलेली आहे त्या गावातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा.शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या सर्व अर्जांची कृषी विभागाकडून पडताळणी करण्यात येईल.पडताळनी केल्यानंतर जे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील अशा शेतकऱ्यांना मूल्य साखळी विकसित करून त्यांना प्रशिक्षित केले जाते.

योजनेत निवड झालेली गावांची यादी

जालना जिल्ह्यासाठी ज्या गावाची किंवा महसूल मंडळाची कापूस किंवा सोयाबीन या पिकाची उत्पादने कमी घेतली जातात किंवा कमी उत्पादने होते अशा गावाची निवड यात करण्यात आली आहे. ज्या गावाचे कापसाचे किंवा सोयाबीन उत्पादन जास्त प्रमाणात केली जातात अशा गावांना याचा लाभ घेता येणार नाही. यामध्ये कापसासाठी ज्या गावांची निवड झालेली आहे त्या गावांची यादी खालीलप्रमाणे आहे.

नेर.

हस्तपिंपळगाव.

नानेगव.

कडेगाव.

सिरसगाव.

बोरगाव.

खडक.

देवुळ.

गोषेगाव.

आनंदवाडी.

वरफळ.

टाकळी.

आंबा.

यदलापूर.

दैठण.

दैठना.

खांडवी.

आष्टी.

सातोना.

लिंगसा.

कारळा.

वरील गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आलेली आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल, ज्या तालुक्यातील असाल त्या तालुक्यांच्या कृषी विभागाशी संपर्क साधून या योजनेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेवू शकता.

Leave a comment