ऑनलाईन पिक विमा अर्ज सादर करण्याची तारीख वाढली आहे. अनेक शेतकरी बांधवणी अजूनही पीक विमा अर्ज सादर केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून द्या. खरीप पीक विमा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 होती, म्हणजेच शेतकरी बांधवांना त्याचा पीक विमा 31 जुलैच्या आता भरणे आवश्यक होते.
परंतु 31 जुलै 2022 रोजी रविवार येत असून सार्वजनिक सुट्टी येत आहे त्यामुळे आता खरीप पीक विमा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक दिवस वाढ देण्यात आली आहे. म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी शेतकरी बांधव आपला पीक विमा भरू शकणार आहे.
ऑनलाईन पिक विमा अर्ज तारीख वाढली
ऑनलाईन पीक विमा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 जुलै एवजी आता 1 ऑगस्ट करण्यात आली आहे. पीएमएफबीवाय या वेबसाइटवर सूचना देण्यात आली आहे. ती बघण्यासाठी खलील लिंकला क्लिक करा.
सार्वजनिक सुट्टीच्या कारणामुळे खरीप पीक विमा अर्ज 2022 सादर करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट च्या मध्य रात्री पर्यंत वाढविण्यात आली आहे.
लगेच पीक विमा अर्ज सादर करून द्या
खरीप पिक विमा अर्ज तारीख वाढून दिली असल्याची सूचना शासनाच्या पीएमएफबीवाय या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. खात्री करण्यासाठी येथे क्लिक करा. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवानी खरीप पिक विमा अर्ज सादर केला नसेल त्यांनी लगेच जवळच्या सीएससी सेंटरवर जावून सादर करून द्यावा.
अर्जासंबंधित अधिक माहिती पहा
पिक विमा हि आग्रहाची विषय वस्तू असल्याने नक्कीच शेतकरी बांधवानी आपापल्या शेतातील पिकांचा पिक विमा उतरवून घ्यावा. जेणे करून नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यास पिक नुकसान भरपाई मिळते.
पिक विमा काढल्यानंतर पिकांचे नुकसान झाले तर नुकसान झाल्यापसून ७२ तासाच्या आत पिक विमा कंपनीस सूचना द्यावी लागती. हि सूचना दिल्यानंतर पिक विमा प्रतिनिधी नुकसानीची पाहणी करण्यासाठी येतात नुकसानीची खात्री झाल्यानंतर. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसानभरपाईची रक्कम जमा केली जावू शकते.
सविस्तर महितीसाठी खलील व्हिडिओ बघा