पीएम किसान मानधन योजना मिळवा दरमहा 3 हजार

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या भारतातील सुमारे 55 ते 60 टक्के लोकसंख्या पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना . या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ३६ हजार रुपये (दरमहा ३ हजार) दिले जातात.

पीएम किसान योजनेची सुरुवात ३१ मे २०१९ साली झाली १८ ते ४० वर्ष वयोगटातील शेतकरी या योजनाचा लाभ घेऊ शकता. चला तर शेतकरी बंधूंनो जाणून घेऊया तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता व त्यासाठी काय पात्रता आहे.

पीएम किसान मानधन योजना पात्रता

  • 18 वर्षे आणि त्यावरील आणि 40 वर्षांपर्यंतचे शेतकरी या योजनेत सामील होऊ शकतात.
  • 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले सर्व छोटे आणि अत्यल्प शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेंतर्गत वयाच्या 60 व्या वर्षी शेतकऱ्यांना 3000 रुपये मासिक पेन्शन मिळेल.
  • शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या पत्नीला निवृत्ती वेतनाच्या 50% कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मिळण्यास पात्र असेल.

योजनेची बातमी वाचा

PM किसान मानधन योजना माहिती

पीएम मानधन योजना ही शेतकाऱ्यांसाठी सुरू असून या योजनसाठी नियमित हप्ते भरल्यास ६० वर्षानंतर प्रत्येक महिन्याला ३ हजारची पेन्शन मिळते. ही योजना २०१९ पासून सुरू झाली असून त्यासाठी नोंदणी csc सेंटरवर जाणून करावी लागते. पीएम किसान मानधन योजना दोन हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केली आहे.

AP किसान पेन्शन योजनेसाठी योजनेसाठी तुम्हाला एकही रुपया भरण्याची गरज नाही पण पीएम किसान मानधन योजनेत तुम्हाला नियमित हप्ते भरावे लागतील.

नोंदणी कशी करावी

शेतकरी बांधवांना प्रथम त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) जावे लागेल. त्यानंतर तेथे सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटर आधार कार्ड तुमच्या अर्जासोबत लिंक करणे आवश्यक आहे.

यानंतर, तुम्हाला किसान कार्ड किसान पेन्शन खाते क्रमांकावर सुपूर्द केले जाईल. याशिवाय, किसान बांधव कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वेबसाइटवर जाऊन या योजनेसाठी स्वतःची नोंदणी करू शकतात.

पीएम किसान मानधन योजनेबद्दल इतर माहितीसाठी, शेतकरी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा जवळच्या सामान्य सेवा केंद्राशी संपर्क साधू शकतात. याशिवाय जिल्हा कृषी कार्यालयात जाऊनही ते याबाबत चौकशी करू शकतात.

अधिक माहिती साठी वेबसाईट पहा – https://maandhan.in/

Leave a comment