नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात शासन निर्णय निर्णय

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकाऱ्यांनाच्या खात्यात नुकसान भरपाई लवकरच जमा केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देणार असल्याचा मोठा निर्णय शिदे सरकारने घेतला आहे. जिरायती शेती सोबतच बागायती शेतकाऱ्यांनाही अतिवृष्टीत हेक्टरी ( 3 हेक्टर पर्यंत) 27 हजार रुपये मदत देण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

त्या संदर्भात माहिती महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. जिरायती शेतीसाठी हेक्टरी 6800 रुपये मदत दिली जाते महावीकस आघाडी सरकारने. त्यात वाढ करून 10 हजार रुपये हेक्टरी मदत दोन हेक्टर पर्यंत दिली होती.

आणखी कामाची योजना पीएम किसान मानधन योजना

नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांना दुपटीने मदत

शिंदे सरकारने नुकसान भरपाईची रक्कम दुपटीने करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना 13,600 रुपये आणि ती देखील 3 हेक्टर पर्यंत दिली जाणार आहे. बहुवार्षिक पिकांच्या आधी दिल्या जाणाऱ्या 15 हजार रुपये हेक्टर एवजी 36 हजार रुपये हेक्टरी मदत दिली जाणार आहे.

याचा अर्थ 1 लाख 8 हजारापर्यंतची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचा बरोबर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहानपर अनुदानाच्या निर्णयाची अंबलबाजवणी करण्यात येत आसल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या भागातील 95 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून काही स्थानिक लोकप्रतिनिधिनी पंचनाम्याबाबत तक्राती केल्या असल्याने त्या त्या भागातील पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. याबाबत शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यात येणार आहे ही मदत शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. जनतेच्या हितासाठी हे सरकार असून कोणत्याही कमाल स्थगिती दिली नसून महत्वपूर्ण निर्णय घेतले जातील असे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देणार

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल. त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

अधिक महितीसाठी खलील बातमीपत्रातील माहिती वाचा

Leave a comment