मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार

नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या लेखामद्धे मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पत्र ठरू शकता का हे बघण्यासाठी हा खलील लेख पूर्ण वाचा. मित्रांनो आता आपला शेतकरी हा आधुनिक पद्धतीने शेती करू लागला आहे. या योनेसाठी कोणते अर्जदार पात्र असणार आहेत, अर्ज कोठे करावा लागणार आहे हि आणि इतर महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदानावर

मित्रांनो आता सध्याच्या आधुनिक काळामध्ये शेतकरी सुद्धा आधुनिक पद्धतीचा वापर करत आहे. अशावेळी तुमच्याकडे मिनी ट्रॅक्टर असेल तर त्याचा उपयोग अगदी शेतातील पिकांमध्ये विविध कामासाठी केला जावू शकतो. मिनी ट्रॅक्टर शासकीय अनुदानावर देखील खरेदी करता येते. मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी शासनाकडून ९० टक्के अनुदान मिळते.

आणखी कामाची योजना अटल पेन्शन योजना २१० रुपयांत मिळाले ५ हजारची पेन्शन

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी पात्रता खालीलप्रमाणे

  • केवळ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतील.
  • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना काहीतरी उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे तसेच त्यांचे राहणीमान बदलावे या उद्देशाने हि योजना राबविली जात आहे.
  • या योजनेंतर्गत 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्या ट्रॅक्टरसाठी लागणारी इतर साहित्य पुरवठा  करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

जाऊन घेवूयात कि या योजनेसाठी ऑनलाईन आज करण्यासठी कोठे अर्ज करावा लागतो.

जाणून घ्या अर्ज कोठे करावा लागणार

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयास तुम्हाला भेट द्यायची आहे. या कार्यालयामध्ये तुम्ही ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकता.

मिनी ट्रॅक्टर  योजना अटी खालीलप्रमाणे

  • जे स्वयंसहाय्यता बचत असणार आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील नागरिक असावेत.
  • स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • बचत गटातील कमीत कमी 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे गरजेचे आहे.
  • मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने म्हणजेच आवश्यक असणारे साहित्य यांच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा रु. 3.50 लाख इतकी असेल,
  • स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.

अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment