घरांचे वाटप लवकरच होणार ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ

नमस्कार मित्रांनो ज्यांना घरे नाहीत अशांसाठी घरांचे वाटप लवकरच होणार आहे. स्वतःच्या मालकीचे चांगले घर असावे अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असते. परंतु वाढती महागाई लक्षात घेता घराचे स्वप्न पूर्ण करणे सर्वसामान्य नागरिकांसाठी जिकरीचे काम होऊन बसते. अशावेळी शासन तुम्हाला तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करू शकते.

स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांसाठी परवडेल अशा किमतीमध्ये घरांची संकल्पना मांडलेली आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनांसारख्या विविध योजनांमधून हक्काची घरे उपलब्ध करुन दिली जात आहेत.

५ हजार २११ घरांच्या सोडतीचा आज दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल माध्यमांद्वारे शुभारंभ करण्यात आला.

आणखी कामाची योजना पीएम किसान मानधन योजना मिळवा दरमहा 3 हजार

पुणे मंडळ म्हाडा यांच्या वतीने घरांचे वाटप लवकरच होणार

पुणे म्हाडा मंडळाच्या ५२११ घरांसाठी सुमारे ९० हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी अर्ज केले होते. ७१ हजारांपेक्षा जास्त अर्जदारांनी अनामत रक्कम भरुन यात सहभाग नोंदविला होता. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तीन हजार घरे तयार असून पुढील येणाऱ्या दीड महिन्यात या घरांचे वाटप केले जाणार आहे.

उर्वरित घरांचे काम एक-दीड वर्षात पूर्ण होईल. काम पूर्ण झाल्यावर त्या घरांचे म्हणजेच सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहेत. या संबधित अधिकृत माहिती शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. ती माहिती बघण्यासाठी खलील बटनावर क्लिक करा.

सर्व सामान्य नागरिकांना मिळणार हक्कांची घरे

त्यामुळे तुम्हाला देखील पुणे मंडळ म्हाडा अंतर्गत सदनिका हवी असेल तर संबधित यंत्रणेशी संपर्क साधून तुम्ही तुमच्या घरांचे स्वप्न पूर्ण करू शकता. ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घर बांधकामासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.

तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये राहत असाल तसेच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी मात्र तुम्हाला तुमच्या गावातील सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा लागतो. घरकुल योजना यादीमध्ये तुमचे नाव आले तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जातो. घरकुल यादीमध्ये नाव येण्यासाठी गावामध्ये एक सर्वे केला जातो.

या सर्वेमध्ये अधिकारी तुमच्या घरी येतात आणि तुमची माहिती नोंद करून घेतात. या सर्वेमध्ये जर तुमचे नावाची नोंद केली तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो.

Leave a comment