ई हक्क प्रणाली द्वारे केले जाणार ऑनलाईन नऊ प्रकारचे फेरफार

नमस्कार शेतकरी बंधूंनो ई हक्क प्रणाली E hakka pranali वापरून आता यापुढे अगदी घरी बसून नऊ प्रकारचे फेरफार ऑनलाईन केले जाणार आहेत. यामुळे तलाठी यांचा तर वेळ वाचणारच आहे परंतु त्यासोबतच शेतकऱ्यांच्या देखील वेळ वाचणार आहे.

शेत जमिनी संदर्भातील ऑफलाईन फेरफार बंद झाले असून यापुढे ई हक्क प्रणाली E hakka pranali वापरून ऑनलाईन फेरफार करावे लागणार आहे. महसूल विभागामधील कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी शासकीय स्तरावरून ई हक्क प्रणालीमध्ये ई फेरफार प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.

यापुढे म्हणजेच १५ जून २०२२ पासून तुम्हाला जर फेरफार करायचा असेल तर त्यासाठी ई हक्क प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ई फेरफार प्रणालीचा उपयोग कसा करावा या संदर्भातील व्हिडीओ लिंक देखील या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेली आहे. तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही इ फेरफार नोंदणी करू शकता.

ई हक्क प्रणाली वापरून नऊ प्रकारचे फेरफार करता येणार

खलील नऊ प्रकारचे फेरफार अर्जदारांना अगदी घरी बसून करता येणार आहेत.

 1. ई – करार नोंदणी.
 2. बोजा चढविणे.                                       
 3. बोजा कमी करणे.
 4. मयताचे नाव कमी करणे.        
 5. अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे.     
 6. एकत्र कुटुंब कर्ताची नोंद कमी करणे.        
 7. विश्वस्तांचे नाव बदलणे
 8. संगणीकृत सात बारा मधील चूक दुरुस्ती करणे.
 9. वारसाची नोंद करणे.                               

digital 7/12 आता अगदी काही मिनिटातच तुमच्या मोबाईल मध्ये

जाणून घ्या फेरफार म्हणजे काय

जमिनीच्या कामकाजात आपण किती वेळा फेरफार हा शब्द ऐकल असेल. पण बऱ्याच जणांना फेरफार म्हणजे काय किंवा त्याची नोंद कशी करावी या बद्दल माहीत नसण्याची शक्यता असते. फेरफार म्हणजे गाव नमूना नंबर ६ मधील नोंदवाही ज्याला हक्क संपादनाचे पत्रक व फेरफार नोंदवही पण म्हणतात.

या नोंदवाहित जमिनीचे सर्व व्यवहार होतात. हे सर्व व्यवहार ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच तलाठी कार्यालयात जावून होत असत. पण आता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

ई हक्क प्रणाली E hakka pranali  फेरफार कसा नोंदवावा आपण पाहूयात

 • सर्वप्रथम महसूल विभागाची वेबसाइट ओपेन करावी लागेल.
 • त्यानंतर पब्लिक डाटा एंट्री नावाचे एक पेज ओपेन होईल.
 • त्यामध्ये जर तुमच अगोदर रजिस्ट्रेशन झालेले असेल तर तुम्ही यूजरनेम, पासवर्ड व कॅपचा कोड टाकून लॉगिन या बटनावर क्लिक करावे.
 • जर तुमचे या अगोदर रजिस्ट्रेशन झालेले नसेल तर क्रिएट न्यू यूजर या लिंकवर क्लिक करून नवीन अकाऊंट बनवावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला यूजर चा प्रकार निवडायच आहे जर सामान्य नागरिक असाल तर यूजर इज सिटीजन असा ऑप्शन निवडुन प्रोसेस या बटनावर क्लिक करा.
 • तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर अर्ज प्रणाली ई-हक्क असे पेज ओपेन होईल. तलाठ्याकडे ज्या फेरफारासाठी अर्ज करायचं आहे ते पर्याय निवडा.

ऑनलाईन अर्ज लिंक

खालील माहिती वकाळजीपूर्वक भरा.

 • अर्जदाराचे नाव.
 • वडीलाचे नाव.
 • मोबाइल नंबर.

वरीलप्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित भारत जावून सेव करत पूढ जायच आहे, शेवटी डॉक्युमेंटचा ऑप्शन येईल त्यासाठी डॉक्युमेंट वर स्व:ताची सही करून स्कॅन करून उपलोड करावा.

 • त्यानंतर एक स्वयघोषणपत्र  भरून आॅग्री या ऑप्शन वरती क्लिक करावे आणि अर्ज सबमिट करावा.
 • त्यानंतर अर्ज तलाठी कार्यालयात जाईल, अर्जाची छाननी होईल आणि तुमची नोंदणी मंजूर होईल.

अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा

Leave a comment