घरासाठी पैसे कमी पडले सरकार देणार ७५ हजार कर्ज

नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ज्या नागरिकांना घरासाठी पैसे कमी पडले आहे आशा लाभार्थीना आता सरकार ७६ हजारापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देशात ग्रामीण भागातील बांधली जाणारी घरे पैशाच्या कमतरतेमुले आता अपूर्ण राहणार नाही. सरकार आता आशा नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

ग्रामीण भागातील अनेक नागरिक प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतात आणि घराचे काम करतात. पण काही वेळा घर बाधण्यासाठी पैसे अपुरे पडतात त्यामुळे आशा नागरिकांचे घर काम पूर्ण होत नाही. आशा नागरिकांना आता काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांना आता सरकार कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

मोफत निर्धूर चूल योजना अर्ज सुरु 2022 असा करा ऑनलाईन अर्ज

घरासाठी पैसे कमी पडले शासनाकडून एवढे मिळेल कर्ज

आता पैशामुळे घराचे काम अपूर्ण असणाऱ्याना घर बांधणीसाठी सरकार ७५ हजार पर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे. केंद्र शासनाचा ग्राम विकास विभाग यासाठी मसुध्याला अंतिम रूप देत आहे क्रेडिट ग्यारंटी योजनांतर्गत संबंधितांना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे.

एवढे मिळते घरकुल योजनेसाठी अनुदान

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मार्च २०२४ पर्यंत देशात २.६२ कोटी घरे बाधण्याचे लक्ष आहे. या योजनेंतर्गत मैदानी भागातील लाभार्थ्याना १.२० लाख आणि डोंगराळ भागातील लाभार्थ्याना १.३० लाख अनुदान घर बांधकामासाठी दिले जाते.

हा खर्च केंद्र व राज्यं सरकार ६०:४० च्या प्रमाणात वाटून घेते. या योजयंतर्गत आता २.४४ कोटी घरे मंजूर करण्यात आली आहे.

प्रत्येकाला मिळणार घर

प्रधानमंत्री आवास योजना १ एप्रिल २०१६ पासून राबविण्यात येत आहे. सरकारने मार्च २०२४ पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २,७१,१२,७१५ पक्की घरे पूर्ण करण्याचे महत्वकांक्षी लक्ष ठेवले आहे. ग्रामीण विकास आराखाडयानुसार १,९६,६२,९३६ घरे पूर्ण झाली आहेत.

आता १६ महिन्यात ७५,२९,८३२ पक्की होण्याची उद्दिष्टे ठेवण्यात आली आहे. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेतला असेल आणि तुमच्या घराचे काम अपूर्ण असेल तर तुम्ही या कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकतात.

त्यासाठी तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुमचा बचत गट असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला लाभ मिळू शकेल.

Leave a comment