नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी आता अधिक सोपी झाली असून या योजनेची नोंदणी आता थोडी वेगळ्या पद्धतीने केली जाणार तर ती कश्याप्रकारे केली जाणार आहे त्या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अजूनही अनेक नागरिकांनी बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी केलेली नाही आहे ज्या नागरिकांनी या योजनेसाठी नोंदणी केली नाही आता त्यांना नोंदणी करणे अधिक सोपे जाणार आहे.
बांधकाम कामगार या योजनेसाठी तुम्ही जर एकदा नोंदणी केली तर या योजनेच्या माध्यमातून तुम्ही विविध योजनाचा लाभ घेऊ शकतात.
ज्या नागरिकांनी या योजनेची नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या चला तर जाणून घेऊया या योजनेची नोंदणी कशा प्रकारे सोपी झाली.
अजून कामाची योजना गोदाम बांधकाम योजना मिळणार साडेबारा लाखापर्यंत अनुदान अर्ज करा
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- फोटो आयडी पुरावा.
- रहिवासी
- वयाचा पुरावा.
- बँक पासबुक झेरॉक्स.
- ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र.
- स्वयंघोषणापत्र
- आधार संमतीपत्र.
वरील सर्व कागदपत्रे JPEJ, JPG, PNG किंवा pdf format मध्ये असावीत. सदरील कागदपत्रांची साईज २ एमबी पेक्षा जास्त नसावी.
ऑनलाईन बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या वेबसाइटला भेट द्या. (वेबसाइट – https://mahabocw.in/mr/ )
- अर्जदाराने त्याचा जिल्हा, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून proceed to farm या बाटणवर क्लिक करा.
- वरील माहिती भरून झाल्यावर अर्ज तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवर ओपन होईल त्यामध्ये स्वतःची माहिती भरा.
- व्यक्तिगत माहिती खालील प्रकारे भरा.
- पीएफ किंवा युएन नंबर उपलब्ध असेल तर तो टाकावा नसल्यास हा रकाना अर्जदार मोकळा सोडू शकतात.
- ईएसआयसी क्रमांक टाकावा नसेल तर हा पर्याय देखील तुम्ही मोकळा सोडू शकता.
- इमेल आयडी असेल तो तो देखील टाकावा.
- वरील संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर अर्जदाराने त्यांचा पत्ता व्यवस्थित टाकावा. कायमचा पत्ता आणि निवासी पत्ता एकच असेल तर फक्त दिलेल्या चौकटीमध्ये टिक करावे.
अर्जदारास त्यांचे कौटुंबिक तपशील खालीलप्रमाणे टाकावे लागणार आहे.
- घरातील व्यक्तींचे नाव.
- त्या व्यक्तीच्या वडिलाचे नाव.
- आडनाव.
- जन्मतारीख.
- वय.
- संबध
- त्या व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक.
- व्यवसाय.
नोंदणी करतांना बँकेचे तपशील खालीलप्रमाणे टाका.
- अर्जदाराच्या बँकेचा आयएफएससी कोड.
- बँक शाखेचे नाव.
- बँकेचा पत्ता.
- एमआयसीआर कोड.
- बँक खाते क्रमांक.
अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा.