जनावरांचा मृत्यू झाल्यास सरसकट भरपाई मिळणार

राज्यात लम्पी रोगाचा प्रदर्भाव वाढत असल्याने शासनाच्या वतीने जनावरांचा मृत्यू झाल्यास सरसकट भरपाई दिली जाणार आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी जणून घेऊया.

शासनाने आता या योजनात पुन्हा काही बदल केले आहे आहे या अगोदर ही भरपाई ज्या शेतकऱ्यांचे ३ जनावरे दगावली आहे अश्याच शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार होती.

परंतु आता ही भरपाई सरसकट दिली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचे एक जनावरे जारी दगावले असेल तरी त्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

याच्या अगोदर झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत फक्त अल्प भूधारक शेतकऱ्यांचा भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र सर्वच शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे.

आणखी कामाची योजना मोफत पिठाची गिरणी योजना असा करा अर्ज

जनावरांचा मृत्यू झाल्यास सरसकट मिळणार भरपाई

नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असून. आता लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाचा (जनावराचा) मृत्यू झाल्यास. अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई अनुज्ञेय करण्यात आल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाचे लम्पी रोगाविषयी महत्त्वाचे दोन निर्णय घेण्यात आले आहेत.

यामध्ये पहिला निर्णय नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असून, आता लम्पी बाधित पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

दुसरा निर्णय पशुपालकांना यापूर्वी लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या जास्तीत जास्त ३ जनावरांसाठी हा लाभ अनुज्ञेय होता.

आता ही अट शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या सर्व पशुधनाकरीता त्यांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

या संदर्भातील आवश्यक पत्र शासन स्तरावरून निर्गमीत झाले असून अनुषंगिक शासन निर्णय लवकरच जारी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रात ८२. ३२ टक्के लसीकरण झाले पूर्ण

राज्यामध्ये दि. ०७.१०.२०२२ अखेर ३२ जिल्ह्यांमधील एकूण २ हजार २६७ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

बाधित गावांतील एकूण ६३ हजार ०६४ बाधित पशुधनापैकी एकूण ३३ हजार ६७५ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.

उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 128.01 लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

त्यामधून एकूण 115.18 लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले असून

अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे.

खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 82.32 % गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.

1 thought on “जनावरांचा मृत्यू झाल्यास सरसकट भरपाई मिळणार”

Leave a comment