नमस्कार शेतकरी बंधूंनो शेत रस्त्यासाठी २४ लाख रुपये मिळणार असल्याची माहिती मंत्री महोदय यांनी दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा खूप चांगल्या परकरे लाभ होणार आहे.
ही योजना अद्याप सुरू नसली तरी या योजनेची नव्याने अंबलबजावणी केली जाणार आहे आणि लवकरच सुरू केली जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
शेतकरी मित्रांनो शेती करत असताना सर्वात मोठा प्रश्न असा आहे की तुमच्या शेतामध्ये जाण्यास चांगला रास्ता आहे का जर शेतात जाण्यास चांगला रास्ता असेल तर शेतात अवजारे नेणे सोपे जाते.
याशिवाय शेतामधील शेत माल बाहेर काढण्यासाठी सुद्धा तुमच्या शेतीला चंगला रास्ता हवा असतो योग्य वेळी शेत माल बाजारात घेऊन गेल्याने तुमच्या पिकाला सुद्धा योग्य भाव मिळतो.
या सर्व कारणामुळे शेतीला रास्ता असणे ही खूप आवश्यक आहे
म्हणूनच शासनाने मातोश्री योजना सुरू केली होती या योजनेंतर्गत शेत रास्ता निर्मितीसाठी १ किमी पर्यंत १ लाख मिळत होते.
परंतु आता यापुढे शेत रास्ता निर्मतीसाठी एक लाख नाही तर २४ लाख रुपये मिळणार आहे
या अनुदानातून शेतात जाण्यासाठी पक्का रास्ता बनवता येणार असल्याची माहिती फलोत्पादन मंत्र्यांनी दिली.
गोदाम बांधकाम योजना मिळणार साडेबारा लाखापर्यंत अनुदान अर्ज करा
शेत रस्त्यासाठी २४ लाख रुपये मिळणार
यापुढे एकाही जाचक अटीमुळे शेतकरी किंवा शेतमजूर शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीची नियमावली तयार केली आहे.
प्रत्येकाला शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता हवा तर माझ्या शेतकरी बांधवाला देखील त्यांच्या शेतात जायला पक्का रस्ता का नको
म्हणून एका किलोमीटरला ज्या ठिकाणी एक लाख रुपये निधी होता तो आता 24 लाख रुपये करण्यात आलेला आहे.
अशी माहिती रोजगार हमी फलोत्पादन मंत्री संदीपन भुमरे यांनी दिली आहे.
यातून शेतकऱ्यांना असलेल्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी फलोत्पादन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले आहे.
शेतकर्यांना आता शेतात जाणे होणार सोपे
ज्या शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतात जाण्यासाठी शेत रस्ता land road नाही अशा शेतकरी बांधवांसाठी हि आनंदाची बातमी आहे.
शेतात जाण्यासाठी पक्का आणि दर्जेदार रस्ता जर मिळाला तर नक्कीच शेतकऱ्यांची प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते.
ग्रामीण भागामध्ये शेत रस्ता प्रकरणी वाद विवाद होत असतात. शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता जर शेतकऱ्यांना मिळाला तर शेत मशागतीसाठी लागणारे ट्रॅक्टर, ट्रक व इतर वाहने अगदी सहजपणे शेतामध्ये येईल
यामुळे शेत मशागतीची त्याचप्रमाणे माल वाहतुकीची सुविधा शेतकऱ्यांना मिळेल.