अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान संदर्भात माहिती आपण आज या लेखात जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीचे अनुदान आता शेवटच्या टप्प्यात आले असून ते खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
काही जिल्ह्यांना तर ही अनुदान पाठवण्यात सुद्धा आलेले आहे त्या जिल्ह्याची यादी आपण पहाणारच आहोत.
जून ते ऑगस्ट 2022 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांना अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत
नवीन शासन निर्णय शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे.
अतिवृष्टी व चक्रीवादळ यामुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास नंतरच्या हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान ज्याला इनपुट सबसिडी असे देखील म्हटले जाते.
इनपुट सबसिडी स्वरूपात एक हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते हे आपणाला माहित असेलच.
महाराष्ट्र राज्यामध्ये जुलै 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यामध्ये शेत पिकांचे नुकसान झाले होते.
अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत तसेच इतर नुकसान करिता मदत देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला होता.
हे देखिल वाचा : ५० हजार प्रोत्साहन अनुदान हवे आहे मग करा हे काम तरच मिळेल लाभ
अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२ निधी आला
यानुसार राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतीच्या शेती पिकांच्या नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांना खालील प्रमाणे
वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
विहित करण्यात आलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झाले होते.
त्यानुसार बाबीत त्यानुसार बाधित शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान व शेतजमीचे नुकसान याकरिता मदतीचे वाटप करण्यासाठी
एकूण 3501.1 कोटी रुपये 98.58 कोटी व रुपये 335.17 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
24 तासात 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात.
शेती पिकांचे नुकसान 33% पेक्षा जास्त झाले असेल तर त्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते.
परंतु काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते.
हे देखिल वाचा : अतिवृष्टी अनुदान २०२२ या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
या जिल्ह्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई
शासन निर्णय महसूल व वन विभागामध्ये अतिवृष्टी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळल्यास
अशा नुकसानी फुटी विशेष बाब म्हणून मदत देण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी शासनास प्रस्ताव पाठवण्याची तरतूद आहे.
या तरतुदीनुसार चालू हंगामामध्ये विभागीय आयुक्त औरंगाबाद विभागीय आयुक्त अमरावती व विभागीय आयुक्त पुणे
यांच्याकडून अतिवृष्टीच्या नकाशा बाहेरील पावसामुळे ते 30 टक्के पेक्षा जास्त पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत शासनास प्रस्ताव प्राप्त झालेले होते.
हे प्रस्ताव निर्णयार्थ माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उप समितीच्या दिनांक 29.9.2022 रोजी झालेल्या बैठकीत ठेवण्यात आले होते.
मंत्रिमंडळ उप समितीने चालू हंगामा करता अतिवृष्टीच्या नकाशा बाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानेकरिता विशेष बाब म्हणून विहित दराने मदत देण्याबाबत निर्णय घेतला आहे.
त्यानुसार निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली होती.