व्यवसायासाठी मिळणार 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

राज्यातील तरुण युवकांना व्यवसायासाठी मिळणार 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यातील मराठा समाजातील युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णा साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत अण्णा साहेब पाटील कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेतून 10 हजार ते 1 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज तरुण युवकांना मिळणार आहे.

शासनाने दिलेले हे कर्ज बिनव्याजी असणार आहे त्याला तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्याज लावले जाणार नाही या कर्जाची प्रतिदिन 10 रुपये प्रमाणे परतफेड करावी लागणार आहे.

यामुळे मराठा समाजातील तरुण युवकांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करता येणार आहे.

हे देखील वाचा : रब्बी हंगाम 2022-23 पिकांचे हमीभाव जाहीर

व्यवसायासाठी मिळणार 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

अण्णा साहेब पाटील कर्ज योजनांतर्गत युवकांना व्यवसाय करण्यासाठी 10 हजार ते 1 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.

या कर्जाची नियमित परतफेड केल्यानंतर युवकांना या योजनातून वाढीव कर्ज घेता येणार आहे. या कर्ज योजनेच्या लाभासाठी महामंडळाच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे.

मराठा समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगार तरुण आहेत. अशा तरुणांना व्यवसाय करता यावा या उद्देशाने त्यांना 10 हजार रुपये एक रक्कमी कर्ज बिनव्याजी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे

योजनेची बातमी वाचा

कर्ज मर्यादा वाढत जाणार

ज्या तरुणांना हे कर्ज दिले जाणार आहे त्यांना हे कर्ज फेडण्यासाठी केवळ १० रुपये प्रतिदिन द्यावे लागणार आहे.

म्हणजेच अगदी सुलभ पद्धतीने हे कर्ज फेडता येणार आहे. यामुळे मराठा समाजातील छोटा मोठा व्यवसाय करण्यास मदत मिळणार आहे.

१० हजार रुपयांच्या कर्जाची परतफेड केल्यानंतर अगदी अशाच पद्धतीने 50 हजार रुपये कर्ज अशा होतकरू तरुणांस मिळणार आहे.

यामुळे अनेक तरुणांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मदत मिळणार आहे.

५० हजार रुपयांचे कर्ज मिळाल्यानंतर त्या कर्जाच्या परतफेडीपोटी ५० रुपये प्रती दिन अशी परतफेड करावी लागणार आहे.

अशाच पद्धतीने हे ५० हजार रुपयांचे कर्ज देखील व्यवस्थित फेडल्यानंतर अशा तरुणांस १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.

ऑनलाइन अर्ज करा

अशी करा कर्जाची परतफेड

हे कर्ज मुदतीत परतफेड केल्यानंतर याच पद्धतीने पुन्हा 1 लाखाचे कर्ज प्रतिदिन 100 रुपये परतावा या प्रमाणे दिले जाणार आहे.

यामुळे तरुणांस उद्योग व्यवसाय करण्यास मदत मिळणार आहे.

अशा जवळपास 10 हजार घटकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचा मानस व्यक्त करण्यात आलेला आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज घेण्यासाठी यापूर्वी वयोमर्यादा 45 वर्ष होती ती वाढवून आता 60 वर्ष अशी करण्याचाही निर्णय देखील घेण्यात आलेला आहे.

तर शेतकरी बंधुनो तुमच्या मुलाला किंवा तुम्ही स्वतः तरुण असाल तर तुम्हाला आता कर्ज मिळणे अधिक सोपे होणार आहे.

उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून हे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

योजनेची अधिकृत माहिती वाचा

Leave a comment