पशुपालकांच्या खात्यावर 8.05 कोटी झाले जमा पहा

नमस्कार मित्रांनो पशुधनाच्या नुकसान भरपाईपोटी पशुपालकांच्या खात्यावर 8.05 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की राज्यातील पशुधनावर लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे राज्यातील अनेक जनावरे दगावली आहे.

त्यामुळे राज्य शासनाने ज्या पशुपालकांच्या जनावराकहा लम्पीचर्मरोगामुळे मृत्यू झाला आहे आशा पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे त्या संदर्भात माहिती महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या अधिकृत संकेतस्थळवर देखील प्रकाशित करण्यात आली आहे.

आणखी कामाची योजना आयुष्मान भारत योजना यादी pdf अशी करा डाउनलोड

पशुपालकांच्या खात्यावर 8.05 कोटी जमा

राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशूधन मृत्यू मुखी पडले आहे आशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

ही नुकसान भरपाई थेट पशुपालकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. 8.05 एवढी रक्कम पशुपालकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

त्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह  यांनी दिली आहे.

राज्यामध्ये दि. 31 ऑक्टोबर २०२२ अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3204 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे.

बाधित गावांतील एकूण 172528 बाधित पशुधनापैकी एकूण 112683 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.  उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहे

अधिकृत माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खालील जिल्ह्यातील लसीकरण झाले पूर्ण

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 140.97 लक्ष लस  उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यामधून एकूण 136.48 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे त्या जिल्ह्याचे नाव खालील प्रमाणे आहे.

जळगांव

अहमदनगर

धुळे

अकोला

औरंगाबाद

बीड

उस्मानाबाद

कोल्हापूर

सांगली

सोलापूर

वाशिम

जालना

हिंगोली

नंदुरबार

मुंबई उपनगर

या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे.

नुकसान भरपाईमुळे पशुपालकांना मोठा दिलासा

राज्यात लम्पी चर्मरोगाचे प्रमाण खूप वाढले असून या रोगामुळे काही शेतकऱ्यांची जनावरे दगावली सुद्धा आहे व काही जाणवरे या रोगामुळे मृत्यू मुखी सुद्धा पडली आहे.

ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहे आशा शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 8.05 कोटी एवढी रक्कम जमा केली आहे.

या नुकसान भरपाईमुळे शेतकरी या संकटातून स्वतःला सावरू शकतील अशी अपेक्षा शासनाला आहे.

त्या जनावरांना या रोगाची लागण झाली आहे त्यांच्यावर उपचार चालू आहे तर शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे.

Leave a comment