सौर ऊर्जेसाठी शेती भाड्याने द्या आणि 30 हजार कमवा

शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे आता शेतकऱ्यांची पडीक जमीन वाया जाणार नाही कारण तुम्ही सौर उर्जेसाठी शेती भाड्याने देऊन 30 हजार रुपये कामवू शकता.

शेतकऱ्यांना 24 तास विजेचा पुरवठा करण्यात यावा यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री कृषि सौर वाहिनी योजना आणली आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

या योजनेंतर्गत शेतकरी त्याची पडीक जमीन भाड्याने देऊन 30 हजार रुपये कामवू शकणार आहे

तसेच या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

अनेक शेतकरी सौर कृषि पंपाची मागणी करतात शेतकरी सौर ऊर्जेची रक्कम भरून देखील काही वेळा जोडणी वेळेत होत नाही त्यामुळे पिकाचा हंगाम वाया जातो.

आशा शेतकऱ्यांनी प्राधान्याने या योजनेचा लाभ देण्याचा महावीतरणाचा विचार आहे.

संबंधित बातमी वाचा

सौर उर्जेसाठी शेती भाड्याने दिल्यास मिळणार 30 हजार

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी ही योजना राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्या असा शासनाचा विचार आहे.

या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेऊन तेथे सौर कृषि पंप बसवला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळेल.

त्याच बरोबर ज्या शेतकऱ्यांनी जमीन भाड्याने दिली आहे त्या शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीचा मोबदला म्हणून 30 हजार रुपये मिळणार आहे.

आणखी वाचा पीएम किसान मानधन योजना मिळवा दरमहा 3 हजार

मुख्यमंत्री कृषि सौर वाहिनी योजना माहिती

परांपारिक ऊर्जेची बचत व्हावी व अतिरिक्त वीज खरेदी करण्याचा खर्च वाचवा यासाठी मुख्यमंत्री कृषि सौर वाहिनी योजना 2017 मध्ये सुरू करण्यात आली आहे.

राळेगणसिद्धी व कोळंबी येथे प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला ही योजना राबवली होती.

राज्यात 11 केव्ही ते 132 केव्ही वीज उपकेंद्राच्या 5 ते 10 की.मी परिसरात या योजनेचे कार्य सुरू केले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरण केंद्रापासून जमीन 5 की. मी अंतरावर असणे आवश्यक आहे

किमान तीन ते जास्तीत जास्त पाच एकर पर्यंत जमीन भाड्याने घेतली जावू शकते.

Leave a comment