नमस्कार शेतकरी मित्रांनो लम्पी रोग नुकसानभरपाई जमा करण्यात आली असून या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे. हि नुकसान भरपाई कशी मिळणार आहे त्या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेवूयात.
शेतकरी बांधवांसाठी व पशुपालकांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की ज्या पशुपालकांच्या पशुधानांचे लम्पी आजारामुळे नुकसान झाले होते त्यांच्या बँक खात्यामध्ये आता नुकसानभरपाई मदत जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.
लम्पी रोगामुळे शेतकरी गाई, बैल, वासरे यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा करण्यात आलेले आहेत. या संदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे.
तुमचे देखील जनावर लम्पी रोगामुळे दगावले असेल तर तुम्हाला देखील शासनाच्या या नुकसानभरपाईचा लाभ मिळू शकतो.
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांच्या पशुधनांचे लम्पी आजारामुळे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते. ज्या शेतकरी बांधवांच्या पशुधनांचे लम्पी रोगामुळे नुकसान झाले असेल त्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत शासनाने एक जी आर देखील दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी काढण्यात आला होता.
आणखी कामाची योजना जनावरांचा मृत्यू झाल्यास सरसकट भरपाई मिळणार
लम्पी रोग नुकसानभरपाई जमा होत असून खालीलप्रमाणे मिळेल हि भरपाई
या जी आर नुसार ज्या शेतकरी बांधवांच्या पशुधानांचे नुकसान झाले असेल त्यांना खालीलप्रमाणे मदत जाहीर करण्यात आली होती.
१) असे शेतकरी ज्यांच्याकडे दुधाळ जनावरे असतील आणि ही जनावरे लम्पी रोगाने प्रभावित झाली असतील तर अशा पशुपालकांना 30 हजार रुपये प्रती जनावर याप्रमाणे 90 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळेल.
लक्षात असू द्या कि शेतकऱ्यांकडील केवळ तीनच जनावरांना याचा लाभ मिळणार आहे.
2) शेतकऱ्यांच्या तीन बाधित बैलांना देखील रुपये 25 हजार प्रति बैल या प्रमाणे आर्थिक मदत मिळेल.
3) वासरे म्हणजेच लहान जनावरे असतील आणि त्यांना देखील हा लम्पी रोग झाला असेल तर अशा वासरांना 16 हजार प्रती जनावर याप्रमाणे आर्थिक मदत मिळेल.
नुकसानभरपाई जमा झाल्याची अधिकृत माहिती.
महाराष्ट्र राज्यामध्ये आजच्या तारखेपर्यंत जनावरांना झालेल्या लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3973 पशूंच्या नुकसान भरपाईची 10.23 कोटी इतकी रक्कम पशूपालकांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे.
अधिक महितीसाठी येथे क्लिक करा